भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात भारताचा दणदणीत विजय झाला आहे. सलग आठव्यांदा भारताने पाकिस्तानला मात देऊन विश्वचषकातील आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. भारत-पाकिस्तान सामना नेटकऱ्यांना चर्चेसाठी अनेक मुद्दे देणारा ठरला. यामध्ये हार्दिक पांड्याने बॉलशी साधलेला संवाद मोठ्या प्रमाणात नेटकऱ्यांच्या चर्चेचा मुद्दा ठरला. पण मुंबई पोलिसांनीही हार्दिक पांड्याचा आणखी एक व्हिडीओ शेअर करत नेहमीप्रमाणे वाहतुकींच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबई पोलिसांनी हार्दिकने बॉलशी संवाद साधल्याचा फोटो, व्हिडीओ नव्हे तर शनिवारी भारताने पाकिस्तानवर विजय मिळविल्यानंतर, पांड्याने मुलाखतकार म्हणून उत्स्फूर्त भूमिका घेतली होती. यावेळी तो सहकारी खेळाडू रवींद्र जडेजाची मुलाखत घेण्यासाठी गेला होता. यावेळी जडेजा फोनवर बोलत असल्याचं पांड्याला दिसला. म्हणून यावेळी पांड्याने जडेजाला मजेशीर पद्धतीने फोन ठेवायला सांगितलं त्याचा व्हिडीओ मुंबई पोलिसांनी शेअर केला आहे.

Baba Siddique murder case
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आकाशदीप गिलला पंजाबमधून अटक
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
humanity exists in mumbai
मुंबईत खरंच माणुसकी आहे! रिक्षाचालकाने हरवलेला फोन परत आणून दिला, नेटकरी म्हणाले, “मुंबईचे लोक खूप प्रामाणिक आहे…”
sonu nigam met a child fan beatboxing
Video : छोट्या चाहत्यासाठी रस्त्यात थांबला सोनू निगम, टॅलेंटचं कौतुक केलं अन्…; त्याच्या ‘या’ कृतीचं नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Jui Gadkari
Video : शूटिंगमध्ये फावला वेळ मिळताच जुई गडकरी काय करते? स्वत: व्हिडीओ पोस्ट करत दिली माहिती
Neelam Kothari And Mahesh Thakur
“मी तिच्या अंगावर पडलो अन् नीलमने…”, अभिनेत्याने सांगितला ‘हम साथ साथ है’च्या शूटिंगचा किस्सा; म्हणाला, “त्यानंतर सलमानने…”
Maharashtrachi Hasyajatra fame prithvik pratap reaction on prajakta mali phullwanti movie
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या सेटवर ‘फुलवंती’ चित्रपटाची चर्चा, प्राजक्ता माळीने शेअर केला व्हिडीओ; पृथ्वीक प्रताप म्हणाला, “मला फुलवंती पेक्षा जास्त…”

हेही वाचा- एक फोन आला अन् बँक खात्यातून ८२ हजार रुपये गायब, पोलिसाबरोबर घडला विचित्र प्रकार

पांड्या म्हणाला “फोन काप्पो”

मुंबई पोलिसांनी शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रवींद्र जडेजा फोनवर बोलताना दिसत आहे. यावेळी पांड्या त्याच्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला “फोन पे है, तो फोन काप्पो” असं म्हणतो. (फोन काप्पोचा अर्थ फोन कट कर असा होतो.) म्हणजे पांड्या जडेजाला फोन ठेव असं सांगण्याचा प्रयत्न करतो. या दोघांमधील संवादाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच मुंबई पोलिसांनी नेहमीप्रमाणे लोकांना व्हिडीओतून एक मेसेज देण्याचा प्रयत्न केला.

मुंबई पोलिसांनी या व्हायरल व्हिडीओचा संबंध रस्ता सुरक्षेशी जोडला आहे. मुंबई पोलिसांनी या घटनेचा व्हिडिओ त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं, “जेव्हा आम्ही तुम्हाला गाडी चालवताना फोनवर बोलताना पाहतो” या व्हिडीओतून मुंबई पोलिसांनी गाडी चालवताना फोनवर बोलू नका असं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर पोलिसांचा नागरिकांमध्ये वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृती करण्याचा अनोखा अंदाज नेटकऱ्यांना आवडल्याचं पाहायला मिळत आहे.

आतापर्यंत हा व्हिडीओ २९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तर नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर आणि पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीचं कौतुक करणाऱ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, “मी मुंबई पोलिसांच्या क्रिएटिव्हिटीचा मोठा फॅन आहे, ते नेहमीच व्हायरल गोष्टींमधून लोकांना चांगला मेसेज देण्याचा प्रयत्न करतात.”