अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

Indian Air Force Plane Crashed: नायजेरियात भारतीय वायुसेनेचे विमान एमआय-१७१ क्रॅश झाल्यामुळे २६ सैनिकांचा मृत्यू झाला तर आठ जण जखमी झाले, असा दावा करत एक फोटो व्हायरल होत असल्याचे लाईटहाऊस जर्नालिज्मच्या लक्षात आले.

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर यूजर Ghanshyamkm ने व्हायरल ट्विट शेअर केले.

इतर वापरकर्ते देखील समान पोस्ट शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही गुगल रिव्हर्स इमेज सर्चने आमचा तपास सुरू केला. एका बातमीत आम्हाला हा फोटो सापडला.

BREAKING: Air Force Plane crashes in Benue

या माहितीच्या आधारे हे विमान नायजेरियन विमान असल्याचे समजले. अहवालात म्हटले आहे की, नायजेरियन हवाई दलाचे FT-7NI ट्रेनर विमान बेन्यू राज्याची राजधानी मकुर्डी येथे क्रॅश झाले आहे. आम्ही गूगल कीवर्ड शोधले असता आम्हाला युट्युब वर अपघाताची बातमी सापडली.

व्हिडिओ चे शीर्षक होते: Two NAF Pilots Escape Death As Trainer Aircraft Crashes In Makurdi

ही घटना १४ जुलै २०२३ रोजी नोंदवली गेली. आम्हाला रॉयटर्सच्या वेबसाइटवर याबद्दलचा अहवाल देखील सापडला.

आम्हाला अरब न्यूजवर एक रिपोर्ट देखील सापडला, ज्यामध्ये २६ नायजेरियन सैनिकांच्या निधनाची माहिती देण्यात आली होती.

भारतीय वायुसेनेच्या संदर्भात अशी कोणतीही दुर्घटना घडली आहे का हे देखील आम्ही तपासले आणि PIB फॅक्ट चेकची पोस्ट सापडली, ज्यात ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटले आहे.

दैनिक भास्करने ही बातमी शेअर केल्यावर या वृत्ताबाबत गोंधळ सुरू झाला. संबंधित साईटवरून हे वृत्त आता मागे घेण्यात आले असले तरी त्याचा स्क्रीनशॉट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे.

हे ही वाचा<< भारतात ‘मुस्लिम एक्सप्रेस’ धावणार? ट्रेनचे दृश्य पाहून नेटकरी संतप्त; म्हणाले, “गार्डचं पण ऐकत नाहीत, स्टेशनवरच…”

निष्कर्ष: नायजेरियन विमान अपघाताचा व्हायरल फोटो नायजेरियात भारतीय हवाई दलाच्या क्रॅश झालेल्या विमानाचा असल्याचे सांगून व्हायरल होत आहे. हा दावा सुदैवाने चुकीचा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian air force fighter plane crashed 26 people died leading news site creates chaos know truth before sharing rip posts svs
Show comments