Happy Indian Army Day 2025 Wishes : दरवर्षी भारतात १५ जानेवारी रोजी लष्कर दिवस साजरा केला जातो. हा दिवस देशासाठी बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांच्या सैनिकांच्या सन्मानार्थ साजरा केला जातो. १५ जानेवारी १९४९ रोजी पहिले भारतीय लष्करप्रमुख म्हणून फील्ड मार्शल केएम करिअप्पा यांनी पदभार स्वीकारला होता. त्यादिवसापासून आजचा दिवस लष्कर दिवस म्हणून साजरा केला जातो. भारतीय सैन्यांविषयी आणि त्यांच्या कर्तव्याप्रती प्रत्येकाला आदर आहे. आज या लष्कर दिनानिमित्त तुम्ही सैन्यांना हटके शुभेच्छा देऊ शकता तसेच व्हॉट्सअप, मेसेज, स्टेटसवर सुंदर संदेश शेअर करू शकता. (Indian Army Day 2025 Wishes SMS Messages Status Wallpaper GIF in Marathi send to to Indian soldiers)

Indian Army Day 2025 Wishes
Indian Army Day 2025 Wishes

कितीही श्रीमंती असली तरीही
हा पोशाख आणि हा रुबाब
तुम्ही विकत घेऊ शकत नाही
तो कमवावा लागतो
भारतीय लष्कर दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

भारतमातेच्या संरक्षणासाठी
आपल्या जीवावर उदार होऊन
रक्षण करणाऱ्या वीर जवानांना..सलाम..
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

राष्ट्रीय शान आणि गर्वाचे प्रतिक
असणाऱ्या भारतीय जवानांना माझा सलाम!
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

राष्ट्राच्या सीमेवर ताठ मानेने निडरपणे उभे राहून
मातृभूमीचे रक्षण करणाऱ्या शूरवीरांना सलाम !
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

जे फक्त तिरंगा उंच राहण्यासाठी जगतात,
जे मायभूमी च्या सुरक्षेसाठी लढतात, जे देशसेवेसाठी घरदार-कुटुंब सोडतात,
ते सैनिक हुतात्मा होताना मात्र फक्त तिरंग्या ची सोबत करतात !!
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

प्रतिकूल परिस्थितीत स्वतःच्या जीवाची पर्वा न करता
देशाच्या सुरक्षेसाठी सदैव तत्पर असणाऱ्या
शूरवीर जवानांना सलाम
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

फक्त मुलीच घर सोडत नाहीत, साहेब,
मुलंही घर सोडतात, त्यांना सैनिक म्हणतात.
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

भारत भूमीच्या रक्षणासाठी अदम्य साहस आणि शौर्याने लढणाऱ्या
प्रत्येक जवानाला सलाम !
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

हे कंकण करि बांधियले,
जनसेवे जीवन दिधले
राष्ट्रार्थ प्राण हे उरले,
मी सिद्ध मरायाला हो
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

वैभवी देश चढवीन,
सर्वस्व त्यास अर्पीन
तिमिर घोर संहारिन,
या बंधु सहाय्याला हो
बलसागर भारत होवो,
विश्वात शोभुनी राहो
भारतीय लष्कर दिनाच्या शुभेच्छा

Story img Loader