देशाच्या कानाकोपऱ्यातून केवळ द्वेषाच्या बातम्या आणि फोटोज येत असतात. जर तुम्ही सोशल मीडियावरही बघितले तर तिथे लोक अशाच प्रकारच्या चर्चा करतात जे सुसंस्कृत समाजासाठी लाजिरवाणे आहेत. विविधतेतील एकता हे भारत देशाचे वैशिष्ट्य आपण अनेकदा निबंधात, कवितेत किंवा भाषणात अनेकदा वाचलं असेल. पण हळूहळू त्याचा अर्थ विसरत चाललो आहोत. द्वेषाच्या युगात प्रेमाने भरलेला हा फोटो समोर आला आहे. या फोटोमध्ये अनेक लष्करी अधिकारी, जवान एकत्र बसून नमाज अदा करताना दिसत आहेत. सध्या सोशल मीडियावर एक फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे, जे ‘विविधतेतील एकता’चे उत्तम उदाहरण आहे. खरं तर, फोटोमध्ये भारतीय लष्कराचे जवान आणि लेफ्टनंट जनरल डीपी पांडे काश्मीरमध्ये नमाज अदा करताना दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

रमजानच्या पवित्र महिन्यात, लष्कराचे १५ वे कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल डीपी पांडे शीख अधिकारी, इतर वरिष्ठ अधिकारी आणि सैनिक नमाज अदा करताना दिसतात. व्हायरल होत असलेला हा फोटो जम्मू-काश्मीरमधील श्रीनगरचा आहे, जिथे भारतीय लष्कराचे जवान आणि लेफ्टनंट जनरल डीपी पांडे यांनी स्थानिक लोकांना एकतेचा संदेश दिला.

आणखी वाचा : खोदली कबर आणि निघाला जिवंत व्यक्ती…नातेवाईकांनी केलं होत दफन; हा VIRAL VIDEO पाहून तुम्हीही व्हाल हैराण

इफ्तारमध्ये सहभागी झाल्यानंतर त्यांनी नमाज अदा करून बंधुभावाचा आदर्श ठेवला. रिपोर्टनुसार येथे एका पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यानंतर लष्कराचे जवान स्थानिक लोकांसोबत इफ्तारमध्ये सहभागी झाले आणि त्यानंतर नमाज अदामध्येही सहभागी झाले.

हा फोटो संरक्षण सल्लागार @danvir_chauhan यांनी २५ एप्रिल रोजी शेअर केला होता. फोटो शेअर करण्यासोबतच त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “श्रीनगरमध्ये रमजान दरम्यान नमाज अदा करताना लेफ्टनंट जनरल डीपी पांडे.” त्यांच्या या ट्विटला आतापर्यंत २४ हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसंच चार हजारांहून अधिक रिट्विट्स करण्यात आले आहेत.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : देशात पहिल्यांदाच जेसीबीने चोरी! २७ लाख रुपयांनी भरलेले एटीएम चोरट्यांनी उखडले

इथे पाहा हा व्हायरल फोटो :

आणखी वाचा : बापरे! एका रसगुल्ल्यावरून नवरदेव-नवरीने एकमेकांना धू-धू धुतलं; हा VIRAL VIDEO पाहून व्हाल शॉक

माजी आयपीएस अधिकारी @vssnathupur यांनी देखील हा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करत त्यांनी लिहिले की, “भारतीय सैन्य अजूनही कट्टरता आणि कट्टरतावादाच्या विषाणूपासून वाचले आहे ही आनंदाची आणि दिलासादायक बाब आहे…”

हा फोटो अशावेळी समोर आला आहे, जेव्हा यापूर्वी भारतीय लष्कराच्या पीआरओचे ट्विटर हँडल इफ्तारच्या फोटोंवर आक्षेप घेत हटवण्यात आले होते.