भारतीय जवानांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होत असते. त्यांचं धैर्य, शौर्य आणि कट्टर देशभक्ती हे आपल्या देशाचं प्रतिक आहे. आपला जीव धोक्यात घालून डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान नेहमीच तयार असतात. एक जवान होणं हे खायचं काम नाही. त्यासाठी त्यांना विशेष प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंगचं वर्णन ‘अग्निदिव्य’ या एकाच शब्दात करता येऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जवान कशा प्रकारे त्याआधी सराव करतात, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून ‘योद्धा जन्माला येत नाहीत तर तो घडवला जातो’ हे वाक्य सहज आठवतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय जवान खडतर ट्रेनिंग करताना दिसून येत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जवानाच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्याच अंगावर शहारे येतील. या व्हिडीओने सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ पाहून लोक या जवानाचं कौतुक करत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात नक्की असं काय आहे या व्हिडीओमध्ये…

या व्हिडीओमध्ये आर्मीचा युनीफॉर्म परिधान केलेला एक भारतीय जवान दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये तो भारतीय सेनेतील सर्वात कठीण ट्रेनिंग करताना दिसून येत आहे. तो हवेत एका काठीला तरंगत ठेवत त्यावर सहज उभा राहताना दिसून येत आहे. कधी तो एका हाताने पुशअप्स करताना दिसून येत आहे. इतके कठोर स्टंट्स हा भारतीय जवान अगदी सहज करताना दिसून येत आहे. यात उडी घेत हवेतून बदल्यांमधल्या पाण्याला पायाने स्पर्श कऱण्याचा स्टंट तर पाहण्यासारखा होता. या जवानाची शरीरयष्टी मात्र वाखाणण्याजोगी आहे. जवानाचे हे खतरनाक स्टंट पाहून सारेच जण तोंडात बोट घालत आहेत. तुम्ही प्रत्यक्षच पाहा हा व्हायरल व्हिडीओ…

आणखी वाचा : पुन्हा वर्क फ्रॉम होम मिळाल्यानंतर ‘मोहब्बतें’ चित्रपटातला हा सीन होतोय VIRAL, एकदा पाहाच…

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : अरे बापरे! सिंहाला कडेवर घेत फिरत होती महिला; VIRAL VIDEO पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल!

हा व्हिडीओ @major_pawan नावाच्या ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. ‘जय हिंद’ असं कॅप्शनमध्ये लिहित हा व्हिडीओ शेअर केलाय. हा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. भारतीय जवानाची ही कठोर ट्रेनिंग पाहून सारेच जण अवाक झाले आहेत. लोकांना हा व्हिडीओ खूपच आवडू लागला आहे. सारेच जण या भारतीय जवानाच्या प्रेमात पडले आहेत. फक्त सामान्य नागरिकच नव्हे तर सेलिब्रिटी सुद्धा या भारतीय जवानाचं कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : VIRAL : सासऱ्याने कुत्र्यावरच केला बलात्कार, व्हिडीओ रेकॉर्ड केल्यानंतर सुनेसोबतही ‘हे’ कृत्य केलं

बॉलिवूड इंडस्ट्रीत खतरनाक स्टंटसाठी ओळखला जाणारा अभिनेता विद्यूत जामवालने सुद्धा या भारतीय जवानाचं कौतुक केलं आहे. भारतीय जवानाचा हा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रत्येक जण हा नक्की कोण आहे, याचा शोध घेण्यात व्यस्त झाले आहेत. हे पाहून बॉलिवूड अभिनेता विद्यूत जामवाल याने त्याच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. “जय हिंद” असं लिहित अभिनेता विद्यूत जामवालने त्याचा व्हिडीओ शेअर केलाय.

सोशल मीडियावर खतरनाक स्टंटसाठी चर्चेत आलेला हा भारतीय जवानाचं नाव अनमोल चौधरी आहे. अनमोल चौधरी त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर आपल्या अशा वेगवेगळ्या स्टंट्सचे व्हिडीओ शेअर करत असतो. सध्याचा त्याचा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जाऊन त्याचे इतर स्टंट व्हिडीओ पाहू लागले आहेत. त्याच्या या व्हायरल व्हिडीओला आतापर्यंत ६ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर हजारो युजर्सनी या व्हिडीओवर कमेंट्स शेअर केल्या आहेत. काही युजर्सनी त्याला देशाची शान म्हटलंय, तर काही युजर्सनी सलाम ठोकलाय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian army soldiers hard training video viral social media users says jai hind vidyut jammwal prp