भारतीय जवानांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होत असते. त्यांचं धैर्य, शौर्य आणि कट्टर देशभक्ती हे आपल्या देशाचं प्रतिक आहे. आपला जीव धोक्यात घालून डोळ्यात तेल घालून आपल्या देशाचं संरक्षण करत असतात. सीमेवरील कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी भारतीय जवान नेहमीच तयार असतात. एक जवान होणं हे खायचं काम नाही. त्यासाठी त्यांना विशेष प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. या ट्रेनिंग वर्णन ‘अग्निदिव्य’ या एकाच शब्दात करता येऊ शकतं. कोणत्याही परिस्थितीवर मात करण्यासाठी जवान कशा प्रकारे त्याआधी सराव करतात, याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून ‘योद्धा जन्माला येत नाहीत तर घडवले जातात’ हे वाक्य सहज आठवतं.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या जवानांच्या ट्रेनिंगचा व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्याय अंगावर शहारे येतील. या व्हिडीओमध्ये भारतीय जवानांची ट्रेनिंग सुरू असल्याचं दिसून येत आहे. या जवानांना चिखल्याच्या दलदलीत असलेलं एक सुरूंग पार करण्याचं प्रशिक्षण दिलं जातंय. या सुरूंगातून एका वेळी केवळ एकच जवान जाऊ शकतो, अशा आकारचं हे सुरूंग दिसून येतंय. यातला हा जवान सुरूवातीला या सुरूंगात घुसण्याचा प्रयत्न करतो. पण यात त्याला अडथळे येत असल्याने पुन्हा बाहेर पडतो. त्यानंतर त्याचे प्रशिक्षक त्याचं प्रोत्साहान वाढवताना दिसून येत आहेत. हे ऐकून जवान पुन्हा एकदा जोशात या सुरूंगात घुसण्याचा प्रयत्न करतो. यावेळी मात्र, सुरूंगात प्रवेश करण्यात या जवानाला यश मिळतं. त्यानंतर आत जाऊन हा जवान सुंरूगात अडकणार तर नाही ना, असा विचार मनात येत असतानाच काही वेळानंतर हा जवान सुरूंग पार करून बाहेर पडताना दिसून येतोय. ही ट्रेनिंग पाहून पाहणारे केवळ पाहतच राहतात.

पाहा व्हिडीओ:

Geethak_MP नावाच्या ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. त्यानंतर जवानांच्या या खडतर ट्रेनिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर वाऱ्यासारखा पसरू लागला आहे. “योद्धा जन्माला येत नाहीत, तर ते भारतीय सैन्यात घडतात…” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ पाहून प्रत्येक भारतीयाला हा व्हिडीओ शेअर करण्याचा मोह आवारता येत नाहीय. तसंच हा व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त करताना दिसून येत आहेत.

२७ सेकंदाच्या या व्हिडीओने प्रत्येक भारतीयांची मान उंचावली आहे. भारत देशाचा जवान हा सन्मान मिळवण्यासाठी आधी जवानांना इतक्या खडतर ट्रेनिंगला सामोरे जावं लागत असतं, त्यानंतर ते देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सर्जीकल स्ट्राईकसारख्या मोठ मोठ्या जोखीमीची जबाबदारी यशस्वीपणे पार पाडतात. म्हणूनच ते असामान्य असतात. हे प्रशिक्षण नुसते व्हिडीओमध्ये बघितले तरी सामान्य माणसाच्या मनात हे नक्कीच येते की, इतकं कठीण ट्रेनिंग आपल्याला सात जन्मात जमणार नाही” आणि आपोआपच ह्या जवानांबद्दलचा आदर द्विगुणित होतो.

हा व्हिडीओ १० ऑक्टोंबर रोजी शेअर करण्यात आला होता. व्हिडीओ शेअर करून अवघे २४ तासंच उलटले आहेत तरीही आतापर्यंत १५ मिलियन लोकांनी हा व्हिडीओ पाहिलाय. तर २१ हजांरापेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. त्याचप्रमाणे चार हजारांपेक्षा जास्त लोकांनी रिट्वीट करत भारतील जवानांना सलाम करत आहेत.

Story img Loader