रोजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकालाच एका ब्रेकची गरज असते. त्यामुळे अनेक जण वर्षातून एकदा सुट्टी काढून फिरायला जातात. सोशल मीडियावरही परदेशात फिरण्यासाठी कोणती ठिकाणे आहेत, याचे रील व्हिडीओही अनेकदा पाहायला मिळतात. त्यामुळे आता परदेशात फिरायला जाणं म्हणजे जणू काही एक ट्रेंड सुरू झाला आहे. पण, अनेकदा फिरायला गेल्यावर आपलं सामान चोरी होतं किंवा भटकंतीदरम्यान सामान हरवून जातं. तर आज सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये दुबई पोलिसांनी एका भारतीय मुलाचे कौतुक केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका भारतीय चिमुकल्याचा सन्मान करण्यात आला आहे. मुहम्मद अयान युनिस असे या चिमुकल्याचे नाव आहे. पर्यटनस्थळी बाबांबरोबर फिरायला आलेल्या या चिमुकल्याला दुबईत एका पर्यटकाचे हरवलेलं घड्याळ सापडतं. घड्याळ दिसताच त्यांनी दुबईच्या पोलिसांकडे ते सोपवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे दुबई पोलिसांनी त्या पर्यटकांशी संवाद साधला व घड्याळ त्यांच्याकडे पोहचवण्यात यशस्वी झाले. यादरम्यान हा चिमुकला त्याच्या मायदेशी भारतात परतला असतो. त्यामुळे दुबई पोलिसांनी त्या चिमुकल्याशी संवाद साधला व त्याला पुन्हा दुबईत बोलावून घेतले. हरवलेलं घड्याळ पोलिसांकडे सोपवण्याचा निर्णय घेतल्यामुळे दुबई पोलिसांनी त्याचा सन्मान केला आहे. एकदा पाहाच ही व्हायरल पोस्ट…

हेही वाचा…VIDEO: नैसर्गिकरित्या पाणी कसं थंड करावे? महिलेनं सांगितलेली ‘ही’ ट्रिक पाहा; पाणी फ्रिजसारखं होईल गार

पोस्ट नक्की बघा…

चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक करण्यासाठी दुबई टूरिस्ट पोलिस विभागाने मुहम्मद अयानसाठी एक सन्मान समारंभ ठेवला. ब्रिगेडियर खलफान ओबेद अल जल्लाफ, पर्यटन पोलिस विभागाचे संचालक आणि इतर अधिकाऱ्यांसह, मुहम्मद अयान यांना प्रमाणपत्र दिले व त्याच्याबरोबर एक खास फोटोसुद्धा काढला. सोशल मीडियावर ही पोस्ट दुबई पोलिस यांच्या @DubaiPoliceHQ या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. तसेच ही पोस्ट पाहून दुबई फिरायला आलेल्या पर्यटकाने पोस्टखाली कमेंट करत आभारसुद्धा मानले आहेत. एकूणच सोशल मीडियावर चिमुकल्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होताना कमेंटमध्ये दिसून येत आहे.

प्रवासादरम्यान किंवा फिरायला गेल्यावर एखादी वस्तू हरवली, तर ती परत मिळण्याची अपेक्षा फारच कमी असते. पण, दुबईत फिरायला येणाऱ्या पर्यटकाला एका चिमुकल्याच्या प्रामाणिकपणामुळे त्याचं हरवलेलं घड्याळ खास पद्धतीत मिळालं आहे; ज्याचे दुबई पोलिसांनी भरभरून कौतुक व सन्मान केला आहे व ही पोस्ट सोशल मीडियावर शेअर करण्याचे ठरवले आहे. नेटकरीसुद्धा कमेंटमधून चिमुकल्याच्या कामगिरीचे कौतुक करताना दिसून आले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian boy for returning tourist lost watch dubai tourist police department recognised ayan for his honesty and good judgement asp