उन्हाळा जवळपास संपत आला तर उष्णतेच्या लाटांची तीव्रता काही कमी होईना. भारतातील अनेक राज्ये प्रचंड उष्णतेने त्रस्त आहेत. तापमानाचा पारा वाढत असल्याने त्याचा परिणाम फक्त माणसांवरच नाही तर प्राण्यांवरही झाला आहे. सोशल मीडियाव एका माकडाला उष्माघाताचा त्रास झाला आणि बेशुद्ध झाला. सुदैवाने एका पोलिसा अधिकाऱ्याने त्याचा जीव वाचवला. ही घटना उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये घडली. माकडावर उपचार करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्याचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओने नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. पोलिस अधिकाऱ्याच्या कृतीचे सर्वजण कौतुक करत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

व्हायरल व्हिडीओमध्ये एक माकड उष्माघातामुळे बेशुद्ध झाल्याचे दिसते आहे. एका पोलिस अधिकाऱ्याला बेशुद्ध माकड सापडते. व्हायरल व्हिडीओमध्ये एक पोलिस माकडाच्या छातीत हाताने दाबण्याता करत असल्याचे दाखवले आहे जेणेकरून त्याचा श्वास पुन्हा चालू होईल. पोलिस अधिकारी माकडाला पाठीवर वळवतो आणि पाठीवर हलक्या हाताने थोपटतो. त्याला पाणी पाजतो त्याचा श्वास पुन्हा सुरु होतो ज्यामुळे माकड शुद्धीत येते.

हेही वाचा – माय-लेकरांची झाली ताटातूट! ३० फूट खोल वाळूच्या विहिरीत पडले हत्तीचे पिल्लू, ८ तास चालली बचाव मोहिम, पाहा हृदयस्पर्शी Video

टाईम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, विकास तोमर, छतरी पोलिस स्टेशनचे हेड कॉन्स्टेबल असे या पोलिसाचे नाव आहे. ही घटना २४ मे रोजी घडली होती.

हेही वाचा – बातम्या सांगणाऱ्या अँकरच्या तोंडात गेली माशी….पुढे जे घडले ते पाहून बसेल धक्का! पाहा Viral Video

तोमर(वय ५१),यांनी टाईम्स ऑफ इंडियाला सांगितले की त्यांनी आपत्कालीन परिस्थिती हाताळण्याचे प्रशिक्षण दिले आहे आणि त्रासाला प्रतिसाद दिला आहे. “माणूस आणि माकडांची शरीरे अगदी सारखीच असल्याने, मी माकडाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या सहकाऱ्यांनी मला चिडलेल्या टोळीपासून वाचवले. मी जवळजवळ ४५ मिनिटे माकडाच्या छातीला अधूनमधून चोळत होते आणि थोडेसे पाणी तोंडात टाकून पंप केले आणि शेवटी ते पुन्हा जिवंत झाले.”

TOI ने पशुवैद्य डॉ हरी ओम शर्मा यांनी सांगितले: “माकडाला उष्माघाताचा झटका आला आणि निर्जलीकरणामुळे तो बेशुद्ध झाला. वेळीच मदत केल्याने त्याचा जीव वाचला. ते शुद्धीवर आल्यानंतर आम्ही प्रतिजैविक दिले.”

तोमर म्हणाले की, पुनरुज्जीवन झाल्यापासून, माकड दररोज पोलिस स्टेशनला भेट देतात आणि तेथे प्राण्या खेळताना पाहून आनंद होतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cop administers cpr revives fainting monkey video goes viral snk
Show comments