भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंत एका जाहिरातीमुळे टीकेचा धनी ठरला आहे. ऋषभ पंतने ड्रीम ११ साठी केलेल्या जाहिरातीवर गायक, संगीतकारांनी टीका केली असून हा शास्त्रीय संगीताचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्ती, सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी ट्वीट करत आपली नाराजी जाहीर केली आहे. टी-२० विश्वचषक २०२२ दरम्यान ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ड्रीम ११ च्या या जाहिरातीमध्ये ऋषभ पंतला शास्त्रीय गायक दाखवत खिल्ली उडवण्यात आली आहे. “नशीब मी माझ्या स्वप्नाचा पाठलाग केला,” असं ऋषभ या जाहिरातीत म्हणत आहे.

कौशिकी यांनी ट्विट करत ऋषभ पंतवर टीका केली असून, भारतीय शास्त्रीय संगीताचा अपमान करुन प्रसिद्धी मिळवत असल्याचं म्हटलं आहे. “या जाहिरातीमधील गलिच्छपणा व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. आपल्या वारशाचा अनादर केल्याने तू मूर्ख दिसत आहेत,” असं त्यांनी म्हटलं आहे.

“हे पंडित रवी शंकर, उस्ताद झाकीर हुसेन, पंडित भीमसेन जोशी यांचं संगीत आहे. हे करुन तुला प्रसिद्धी मिळत आहे याची मला खात्री आहे, पण हे योग्य आहे का?,” अशी विचारणा त्यांनी केली आहे.

“मी भारतीय शास्त्रीय संगीताचा सराव करते. मी क्रिकेट पाहत नाही, पण कधीही तुमच्या खेळाचा अपमान केलेला नाही. जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजून घेण्याचे प्रशिक्षण दिलेले नसेल तेव्हा किमान त्याबद्दल आदर बाळगण्याइतके समजूतदार व्हा. आपल्या वारशाचा अपमान केल्याने तुम्ही मूर्ख दिसत आहात,” असं कौशिकी यांनी म्हटलं आहे.

सतारवादक पूरबायन चॅटर्जी यांनी निवेदन प्रसिद्ध केलं असून त्यात म्हटलं आहे की “जाहिरातीत भारतीय शास्त्रीय संगीताला हास्यास्पद आणि किंचित अपमानास्पद पद्धतीने दर्शवण्यात आलं आहे. हे पहिल्यांदाच झालेलं नाही, पण हे पाहून मला धक्का बसला आहे. यासाठी माफ केलं जाऊ शकत नाही. हा एक महान संगीत कला प्रकार आहे, ज्याचा जगभरात आदर आणि आदर केला जातो. सचिन तेंडुलकर, सुनील गावस्कर यांसारखे दिग्गज या कलाप्रकाराचे उत्तम समर्थक आहेत”.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian cricketer rishabh pant being criticised over dream 11 ad musicians said you look like a fool sgy
Show comments