भारतीय क्रिकेट संघात एकेकाळी फलंदाजीची सुरुवात करण्यासाठी मैदानात येऊन दमदार फटकेबाजी करणारा वीरेंद्र सेहवाग आता सोशल मीडियावरही त्याच अंदाजात वावरताना दिसतोय. बऱ्याच गोष्टींवर वीरु आपल्या शैलीत मतप्रदर्शन करतो. अगदी सेलिब्रिटींच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना अनोख्या अंदाजात शुभेच्छा देण्यापासून ते क्रिकेट सामन्याविषयी खास टीप्पणी करणाऱ्या सेहवागने पुन्हा एकदा ट्विट करत नेटकऱ्यांना एक चर्चेचा विषय दिला आहे.

सेहवागने यावेळी धुम्रपानाचा निषेध करणारं एक ट्विट केलं आहे. ज्यामध्ये त्याने एक फोटोही पोस्ट केला आहे. वीरुने पोस्ट केलेल्या या फोटोमुळेच अनेकांमध्ये हशा पिकल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोमध्ये एक कुटुंब दिसत असून, त्यात दिसणाऱ्या पुरुषाचे तोंड एका पिंजऱ्यात बंद करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे. फोटोवर लिहिल्याप्रमाणे, त्या माणसाने धुम्रपानाच्या सवयीपासून दूर राहण्यासाठी हे पिंजऱ्याचं तंत्र वापरात आणलं असून, त्याची चावी पत्नीकडे दिली आहे. मुख्य म्हणजे फक्त खाण्याच्याच वेळी हा पिंजरा उघडण्यात येतो’. या फोटोवर वीरुने त्याचं मत देत लिहिलं, ‘वा… एखाद्या गोष्टीबद्दलची शिस्तप्रियता किती असावी, काहीही झालं तरीही धुम्रपानाला नेहमीच नाही म्हणा’.

वीरुने हे ट्विट केल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर त्याला फॉलो करणाऱ्यांनीसुद्धा त्यावर व्यक्त होत आपल्या विनोदबुद्धीला चालना दिली. मुख्य म्हणजे वाईट सवय सोडण्यासाठी पिंजऱ्याचा केलेला वापर पाहत, हा उपाय एकदा करुन बघायलाच पाहिजे, अशा प्रतिक्रिया दिल्या.

पाहा : VIDEO: बर्लिनकरही म्हणाले ‘कुछ कुछ होता है’

 

 

Story img Loader