सुधीर कुमार गौतम हे नाव भारतातल्या प्रत्येक क्रिकेटप्रेमींना माहिती आहे. कोणत्याही क्रिकेट संघाच्या पाठीशी सुधीर इतका ‘जबरा फॅन’ उभा नसेल हे नक्की. सचिनचा निस्सीम चाहता असलेला सुधीर भारतीय संघाच्या प्रत्येक सामन्यासाठी स्टेडियममध्ये  हजर असतो.
नखशिखान्त तिरंग्यात रंगून आणि हातात तिरंगा घेऊन मोठ्या उत्साहात भारतीय संघाला प्रोत्साहन देणारा सुधीर म्हणजे ‘क्रिकेट चाहत्याचं’ उत्तम उदाहरण आहे.  सचिनच्या निवृत्तीनंतरही  सुधीर त्याच उत्साहात स्टेडियमवर येतो आणि तितक्याच जोशानं टिम इंडियाला चिअर करतो. तर या जबरा फॅनने नुकतीच भारताचा माजी कर्णधार ‘कॅप्टन कूल माही’ची भेट घेतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जवळपास दोन वर्षांनंतर तो धोनीला भेटला. साहजिक हा क्षण कायम स्मृतीत राहावा यासाठी त्यानं धोनीसोबत फोटोही काढले. भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्यादरम्यान फावल्या वेळात  कॅप्टन कूलसोबत  गप्पाही मारल्या. त्यानं ट्विटवर या भेटीचे सेल्फी आणि व्हिडिओ शेअर केलेत.

https://twitter.com/Sudhir10dulkar/status/899288479049277440

https://twitter.com/Sudhir10dulkar/status/899058535148867585

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian crickets biggest fan sudhir kumar gautam click photo with mahendra singh dhoni