बॉलीवूडच्या प्रसिद्ध गाण्यांवर लिपसिंक करून व्हिडीओ बनवणारा टांझानियाचा सोशल मीडिया स्टार किली पॉलला भारताने सन्मानित केले आहे. टांझानियामधील भारतीय दूतावासाने पॉल याला बोलावून त्याचा सन्मान केला आहे. किली पॉल भारतीय गाण्यांवर लिपसिंक करूनच जगभरात लोकप्रिय झाला आहे. सोशल मीडियावर त्याचे लाखांच्या घरात फॉलोवर्स आहेत. इतकेच नाही तर अनेक बॉलिवूड स्टारसुद्धा त्याला सोशल मीडियावर फॉलो करतात.
टांझानियामधील भारतीय उच्चायुक्त बिनाया प्रधान यांनी सोमवारी २१ फेब्रुवारीला ट्विटरवर किली पॉल याच्यासोबत एक फोटो शेअर करत ही माहिती दिली. या फोटोमध्ये बिनाया प्रधान भारतीय दूतावासाच्या कार्यालयात पॉल याला सन्मानित करताना दिसत आहेत. प्रधान यांनी ट्विट केले आहे की, “आज टांझानियातील भारतीय दूतावासात खास पाहुणे म्हणून किली पॉल यांनी उपस्थिती दर्शवली. त्यांनी भारतीय चित्रपटांतील प्रसिद्ध गाण्यांवरील आपल्या व्हिडीओंनी लाखो भारतीयांची मने जिंकली आहेत.”
आहेर द्यायला आलेल्या व्यक्तीने नवरदेवासोबत केले असे काही; नववधूसह पाहुण्यांनाही बसला धक्का
किली पॉल याने सोशल मीडियाच्या आधारे भारतीय उच्चायुक्तालयाचे आभार मानले आहेत. त्याने लिहलं, “भारतीय उच्चायुक्तालय, आपले खूप-खूप आभार.” शेरशहा या चित्रपटातील गीत ‘रातां लंबिया’च्या ओळींवर लिपसिंक केलेला पॉल याचा व्हिडीओ गेल्यावर्षी बराच चर्चेत होता. या व्हिडीओमध्ये तो आपली बहीण नीना पॉल हिच्यासोबत दिसून आला. यानंतर पॉल इंस्टाग्रामवर खूप लोकप्रिय झाला असून सध्या त्याचे इंस्टाग्रामवर जवळपास २२ लाख फॉलोवर्स आहेत. अभिनेता आयुष्मान खुराना, गुल पनाग आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांच्यासह अनेक लोकप्रिय कलाकारांनी त्याला सोशल मीडियावर फॉलो केले आहे.
ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचं लिखाणाकडे दुर्लक्ष झालंय? चिंता नको अशी लावा लेखनाची सवय
किली पॉलच्या इंस्टाग्राम प्रोफाइलमध्ये त्याचे वर्णन “डान्सर आणि कंटेन्ट क्रिएटर” म्हणून केले जाते. त्याचे युट्युब चॅनेलसुद्धा आहे, जिथे त्याचे सर्व लोकप्रिय व्हिडीओ पोस्ट केले गेले आहेत. खास गोष्ट म्हणजे तो त्याच्या पारंपारिक पोशाखात व्हिडिओ पोस्ट करतो, त्यामुळे त्याची लोकप्रियता आणखीनच वाढत आहे. भारताव्यतिरिक्त तो इतर देशांमध्येही लोकप्रिय होत आहे.