WWE ने हैदराबादमध्ये आयोजित केलेला सुपरस्टार स्पेक्टॅकल इव्हेंटला भारतीयांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला. या इव्हेंटमध्ये दिग्गज रेसलर जॉन सीना, रिया रिप्ली, नताल्या आणि सेथ रोलिन्ससह अनेक रेसलर्सनी सहभाग घेतला होता. या प्रसिद्ध रेसलरर्सची एक झलक पाहण्यासाठी भारतीय चाहतेही फार उत्सुक होते. ही पहिलीच वेळ होती जिथे भारतीय चाहत्यांना त्यांच्या आवडत्या रेसलरला प्रत्यक्ष डोळ्यांनी रिंगमध्ये फाइट करताना पाहता आले. पण या इव्हेंटदरम्यान एक वेळीच फाइट पाहायला मिळाली. जॉन सीनाने भिरकावलेल्या टी-शर्ट मिळवण्यासाठी WWE चाहते आपापसात भिडल्याचे दिसले. त्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WWE सुपरस्टार स्पेक्टॅकलच्या पहिल्या मॅचमध्ये जॉन सीना रिंगमध्ये दाखल होताच तिथे उपस्थित असलेल्या चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. चाहत्यांनी जॉन सीना – जॉन सीनाच्या नावाने घोषणाबाजी सुरु केली. हे पाहून रेसरल जॉन सीनाही इतका उत्साही झाला की, त्याने आपला टी-शर्ट काढून चाहत्यांच्या गर्दीत भिरकावला, यानंतर तो टी-शर्ट मिळवण्यासाठी प्रेक्षकांमध्ये धुमश्चक्री सुरू झाली. यामुळे काहीवेळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. एकाचवेळी ५ ते ७ ते टी-शर्ट ओढत होते. यावेळी चाहत्यांमध्ये थोडी झटापटही पाहायला मिळाली. यामुळे मॅचपेक्षा चाहत्यांचे हे भांडणचं जास्त चर्चेत आले आहे.
यावेळी जॉन सीनाने वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियन सेथ रोलिन्सबरोबर टीम बनवून लुडविग कायजर आणि जिओव्हानी विंचीविरुद्ध मॅच लढली, या सामन्यात सीना आणि सेथने जबरदस्त विजय मिळवला. या शोमध्ये चाहत्यांना एकूण ६ सामने बघायला मिळाले, पण हा शो भारतीय सुपरस्टार्ससाठी अजिबात संस्मरणीय नव्हता. शोमध्ये ४ भारतीय स्टार्स अॅक्शन करताना दिसले, पण सर्व सुपरस्टारला पराभवाचा सामना करावा लागला.
मॅच संपल्यानंतर जॉन सीनाने भारतीय चाहत्यांना संबोधित करत पाठिंब्याबद्दल त्यांचे आभार मानले. जॉन सीना म्हणाला, ‘मी जे बोलतोय ते सर्वांनी ऐकावे अशी माझी इच्छा आहे. आज रात्री मला जे काही बोलणार आहे ते माझ्यासाठी खूप महत्वाचे आहे. मला आजची रात्री इथे राहण्याची परवानगी दिल्याबद्दल धन्यवाद. तुम्हाला माहिती आहे, कधी कधी आपल्याला आतून काहीतरी जाणवते जे आपल्याला भावनिकरित्या पकडते. मला हे तुमच्या सर्वांसोबत शेअर करायचे आहे, मी एकटा आहे की नाही हे तुम्ही मला सांगू शकता पण तरीही मी ते शेअर करणार आहे. मी २० वर्षांपासून या क्षणाची कल्पना करत होतो. मला आजची रात्र असे सांगून संपवायची आहे की, हा क्षण माझ्या कल्पनेपेक्षा खूप मोठा आहे.