Indian Flag Disrespected Video Pakistan Connection: भारतीय ध्वज हा प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाचा विषय आहे. राष्ट्रध्वजाचा अपमान हा केवळ भावनिकच नाही तर कायदेशीर गुन्हाही आहे. मात्र केरळमध्ये हा गुन्हा दिवसाढवळ्या सर्वांसमक्ष होत असूनही काही कारवाई केली जात नसल्याचा दावा सध्या व्हायरल होत आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केलेला एक व्हिडीओ आढळला ज्यामध्ये वाहने भारतीय ध्वजावरून जाणार असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ केरळमधील असल्याचा दावा करण्यात आला होता. तपासादरम्यान आम्हाला या व्हिडीओचा मूळ पाकिस्तानशी कसा संबंध आहे हे लक्षात आले, नेमकं हे प्रकरण काय, चला जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर dk dansal ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.

police file case for forcing girl to perform obscene act in shelter home
धक्कादायक : लेस्बियन असल्याचे सांगून निरीक्षणगृहात मुलीवर बळजबरी, अधिपरिचारिकेविरुद्ध गुन्हा
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
s Jaishankar marathi news
अन्वयार्थ: …उर्वरित २५ टक्के सैन्यमाघारी कधी?
How India response to Vladimir Putin in the Ukraine war
युक्रेन युद्धात पुतिन यांना हवी भारताची मध्यस्थी? भारताकडून प्रतिसादाची शक्यता किती?
Sunil Ambekar clarified that the Rashtriya Swayamsevak Sangh is in favor of conducting a caste wise census
जातीनिहाय जनगणनेसाठी संघ अनुकूल; राजकारणासाठी वापर होऊ नये, अशी अपेक्षा
India Nuclear powered Ballistic Missile Submarine SSBN INS Arighat
‘आयएनएस अरिघात’चा चीनला धसका का?
s jaishankar on pakistan
S Jaishankar on Pakistan: Video: “कोणत्याही कृतीचे परिणाम होतातच, आता पाकिस्तानशी संवादाचे…”, परराष्ट्रमंत्र्यांनी मांडली परखड भूमिका!
Why are some elements in Bangladesh holding India responsible for the floods
विश्लेषण : पूरस्थितीसाठी बांगलादेशातील काही घटक भारताला जबाबदार का ठरवत आहेत?

इतर वापरकर्ते देखील त्याच दाव्यासह समान व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओच्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च केले. व्हिडीओमध्ये दिसणारी ऑटो रिक्षा पाकिस्तानची असल्याचे आम्हाला समजले.

https://www.olx.com.pk/items/q-rickshaw-new?page=12

एका कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करताना आम्हाला एक पोस्ट सापडली, ज्यामध्ये असे म्हटले होते की हा व्हिडीओ भारतीय ध्वजाचा अनादर करताना पाकिस्तानच्या परेडचा आहे.

ही पोस्ट २०२० सालची आहे.

आम्हाला युट्युबवर एक व्हिडिओ देखील सापडला.

आम्हाला व्हिडिओमध्ये एक फ्रेम दिसली ज्यामध्ये ‘सनम बुटीक’ नावाच्या ठिकाणाचा उल्लेख आहे. आम्ही पाकिस्तानमधील सनम बुटीकवर Google कीवर्ड शोध घेतला आणि त्याचा एक रिझल्ट कराचीमध्ये सापडला. त्यावरून आम्ही गुगल लोकेशन शोधले आणि गुगल मॅपवर अचूक रस्ता आम्हाला दिसला.

https://www.google.com/maps/@24.8775789,67.0636663,3a,75y,294.96h,87.14t/data=!3m6!1e1!3m4!1sAF1QipN-WHfptG2h68n6UhdOaL1SyOX9lkSE1B8x2Qe6!2e10!7i5472!8i2736?entry=ttu

तपासादरम्यान आम्हाला असेही आढळून आले की हा व्हिडीओ २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता.

हे ही वाचा<< “राजा नग्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने..”, नरेंद्र मोदींवर जगप्रसिद्ध वृत्तपत्राची गंभीर टीका? ऑनलाईन वादंग सुरु, खरे मुद्दे पाहा

निष्कर्ष: भारतीय ध्वजाचा अनादर करणाऱ्या लोकांचा पाकिस्तानमधील जुना व्हिडीओ केरळमधील अलीकडचाच असल्याचा दावा करून शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.