मुलगी आणि वडील यांच्यातील प्रेमाबाबत सांगावे तेवढे थोडेच. वडील आपल्या मुलीच्या सुखासाठी कधी काय करतील सांगता येत नाही. ‘मेरी नन्ही परी…’ म्हणत फुलासारखे जपणाऱ्या आपल्या लहानगीला ती कितीही मोठी झाली तरी ते तिला तितकेच जपतात. त्यातही मुलीचे लग्न म्हणजे वडिलांसाठी अतिशय हळवा क्षण. आपल्या काळजाचा तुकडा दुसऱ्याच्या हाती सोपवताना होणाऱ्या वेदना शब्दात मांडणेच कठीण. मग लग्नानंतरही मुलगी सुखी राहावी यासाठी वडिलांची धडपड सुरु असतेच. असाच एक प्रसंग नुकताच घडला. आपल्या लाडक्या मुलीला लग्नात आयफोन ८ भेट देण्यासाठी एका मुलीचे वडील भारतातून थेट सिंगापूरला पोहोचले. विशेष म्हणजे प्रसिद्ध उद्योगपती असलेली ही व्यक्ती फोन खरेदी करण्यासाठी अॅपल स्टोअरच्या बाहेर १३ तास रांगेत उभी राहिली.

Viral Video : पाणीपुरी खाण्याची ‘अशी’ पद्धत तुम्ही कधी पाहिलीये?

आयफोन ८ च्या खरेदीसाठी रांगेत थांबणाऱ्या या व्यक्तीचे नाव आहे अमीन अहमद ढोलिया आणि वय आहे ४३ वर्षे. याबाबत ढोलिया म्हणतात, मी माझ्या २ मुलींसाठी २ फोन खरेदी करणार आहे. अशाप्रकारे मी पहिल्यांदाच कोणत्या गोष्टीसाठी रात्रभर रांगेत थांबलो. नुकताच १२ सप्टेंबर रोजी आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस लाँच कऱण्यात आला. सकाळी जेव्हा कंपनीने आपले दुकान उघडले तेव्हा त्यांच्या रांगेत २०० हून अधिक जण होते. यातील बहुतांश लोक परदेशी असल्याचे ढोलिया यांनी सांगितले. इतर देशात कुठेच आयफोनचे हे नवे मॉडेल लाँच न झाल्याने याठिकाणी मोठी गर्दी झाली होती. मे महिन्यात आयफोनचे सिंगापूरमधील हे स्टोअर सुरु झाले असून तेव्हापासून लाँच करण्यात आलेले ही पहिलीच मॉडेल्स आहेत. त्यामुळे मुलीला भेट देण्यासाठी सिंगापूरला जाणाऱ्या या वडिलांची कमालच आहे.

या फोनला दोन्ही बाजूने ग्लास देण्यात आली आहे. सिल्वर, ग्रे आणि गोल्ड या तीन रंगात आयफोन ८ आणि आयफोन ८ प्लस सादर करण्यात आला. या फोनचे सर्वांत महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे याला वायरलेस चार्जिंगची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे युजरला प्रत्येक ठिकाणी चार्जर बाळगण्याची गरज भासणार नाही. आयफोन ८ चा डिस्प्ले हा ४.७ इंच तर आयफोन ८ प्लसचा डिस्प्ले हा ५.५ इंच इतका असेल. नवीन आयफोनची ग्लास आतापर्यंतची सर्वांत टिकाऊ ग्लास असेल. पाणी आणि धुळीपासून प्रतिरोध करणारा हा फोन आहे. यामध्ये 3D टच आणि ट्रू टोन डिस्प्ले आहे.

Story img Loader