राज्यामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजकारण तापलेलं असतानाच ३ जून रोजी मराठा भाजपा खासदार आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेमध्ये मराठा आरक्षणावरून राज्यातील ठाकरे सरकार आणि खासदार संभाजीराजेंवर टीका केली. “मराठा आरक्षण स्थगितीला ठाकरे सरकारच जबाबदार आहे. मी ३९ वर्षे शिवसेनेत होतो. त्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल शिवसेनेची काय भूमिका आहे?, हे मला चांगलं माहिती आहे”, असं त्यांनी सांगितलं. शरद पवारांनी मराठा समाज आणि आरक्षणाच्या बाजूने बोलण्याची गरज असल्याचं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी संभाजीराजेंवरही टीका केली. मात्र या टीकेच्या बातम्यांनंतर मागील काही दिवसांपासून सोशल नेटवर्किंगवर एका वेगळ्याच कारणासाठी राणेंच्या या पत्रकार परिषदेतील व्हिडीओ व्हायरल होतोय. एका लोकप्रिय मराठी मिम्स पेजने या राणेंच्या पत्रकार परिषदेमधील जीडीपीसंदर्भातील प्रश्नांचा व्हिडीओ एडीट करुन अपलोड केल्यानंतर तो व्हायरल झालाय.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा