कार्यालयीन कामकाजाच्या तणावामुळे बाहेर हॉटेलमध्ये जाऊन जेवण करण्यासाठी अनेक जण प्रवसाचा कंटाळा करतात. त्यामुळं ऑनलाईन फूड ऑर्डर करण्याचा फॅड दिवसेंदिवस वाढला आहे. फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपन्या ऑर्डर केलेलं जेवण काही मिनिटांतच तुमच्या घरी पोहचवतात. मात्र, भारताच्या एका तरुणीने फूड डिलिव्हीरी करण्यासाठी एक दोन नाही, तर तब्बल 30000 किलोमीटरचा प्रवास केला आहे. अशा प्रकारची अजब कामगिरी करुन या तरुणीने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जाणून घ्या या तरुणीबाबत सविस्तर माहिती

चेन्नईत राहणारी मानसा गोपालने इन्स्टाग्रामवर अंटार्कटिका मध्ये फूड डिलिव्हरी करण्यासाठी तब्बल 30 हजार किमीचा प्रवास करून अनेकांच्या भुवया उंचावल्या. हा दूरचा प्रवास मानसाने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर व्हिडीओच्या माध्यमातून शेअर केला आहे. फूड डिलिव्हरीसाठी मानसाने चार मोठ्या बेटांना क्रॉस करून सिंगापूरच्या अंटार्कटिकामध्ये उडी घेतली. फूड डिलिव्हरीचा हा प्रवास जगातील सर्वात लांबचा प्रवास असल्याचं बोललं जात आहे.

इथे पाहा मानसा गोपालचा व्हिडीओ

मानसाने 30 हजार किमीचा प्रवास करण्यासाठी तिच्यासोबत खाऊचे पॅकेट्स ठेवले होते. तिच्या या प्रवासाची सुरुवात सिंगापूरहून झाली होती. त्यानंतर ती हॅम्बर्ग (जर्मनी) मध्ये पोहोचली. त्यानंतर ब्यूनस (अर्जेंटीना) चा प्रवास करून मानसा अंटार्कटिकात दाखल झाली आणि ग्राहकाल तिने फूड डिलिव्हर केलं.मानसाने मोठ्या बहादूरीने बर्फाने आणि चिखलाने भरलेले अनेक रस्ते पार केले. या प्रवासाचा अनुभव तिनं इन्स्टाग्रावर पोस्ट शेअर करुन सांगितला.

व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, मी सिंगापूर ते अंटार्कटिकासाठी एक विशेष फूड डिलिव्हरी केली. हा विचित्र प्रवास लोकांसोबत शेअक करण्यासाठी खूप उत्सुक आहे. तसंच तिनं एका दुसऱ्या पोस्टच्या माध्यमातून म्हटलं की, २०२१ पासून मी अंटार्कटिक अभियानासाठी पैसे कमावण्याचा प्रयत्न करत होते. गतवर्षी फूड पांडाने माझ्या या ट्रिपला स्पॉन्सर केलं.
मानसाने गोपाल ने शेअर केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे. एकाने विचारलं, तु्म्ही कोणतं फूड डिलिव्हर केलं होतं. दुसऱ्यानं म्हटलं, अविश्वसनीय, तर अन्य एका युजरने म्हटलं, एवढी लांब डिलिव्हरी…

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian girl manasa gopal travels 30000 km food delivery from singapore to antarctica makes world record nss