तिचे वय अवघे ९ वर्षे…मात्र तिच्या कामाने तिने जगभरातील वैज्ञानिक थक्क झाले आहेत…इतकेच नाही तर तिचे विचार ऐकण्यासाठी अनेक मोठे वैज्ञानिक हजेरी लावणार आहेत. हरिव्दारमधील अवघ्या ९ वर्षांच्या रिद्धिमा पांडेने विज्ञान क्षेत्रातील अनोखी कामगिरी करत जगात आपली छाप पाडली आहे. अनियंत्रित नैसर्गिक संसाधनांचा अतिवापर, जलवायूचे परिवर्तन आणि शासनाचा याकडे पाहण्याचा दृष्टीकोन यासंदर्भात राष्ट्रीय हरित लवादामध्ये चालू असलेला खटल्यात तिचा महत्त्वाचा सहभाग होता. या सुनावणीदरम्यान तिने केलेले वक्तव्य आता सर्वांसमोर येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

पॅरिसमध्ये जलवायू परिवर्तनासंदर्भात एक कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत रिद्धिमालाही आमंत्रित करण्यात आले आहे. जलवायू परिवर्तनासंदर्भात खटला चालविल्यासंदर्भात या लहान मुलीबाबत बरीच चर्चा झाली होती. रिद्धिमाच्या म्हणण्यानुसार आता ज्याप्रमाणे नैसर्गिक स्त्रोतांचा वापर केला जात आहे त्याची किंमत पुढच्या पिढीला चुकवावी लागणार आहे. यामध्ये प्रदूषणही मोठ्या प्रमाणावर घातक ठरणार आहे.

येणाऱ्या पिढीला चांगले आणि सुरक्षित वातावरण मिळवे यासाठी त्वरीत पाऊले उचलण्याची आवश्यकता आहे. तिच्या या लढ्यामुळे प्रभावित झालेल्या फ्रान्समधील फ्रान्स लिबर्टी या संघटनेने ३ नोव्हेंबर रोजी जलवायू परिवर्तनविषयक कार्यशाळेचे आयोजन केले आहे. रिद्धिमाच्या कार्याची दखल घेत तिला या परिषदेसाठी आमंत्रित कऱण्यात आले आहे. रिद्धिमा नैनिताल मधील असून तिचे वडिल वन्यजीव संरक्षण विभागाशी निगडित असणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमध्ये कार्यरत असून तिची आई वनविभागात कार्यरत आहे.