भारतीय स्वातंत्र्य चळवळतील एक महान क्रांतीकारक म्हणून ओळखले जाणारे लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी आहे. लालाजींना ‘पंजाब केसरी’ म्हणूनही गौरवण्यात आले होते. फेब्रुवारी १९२८ मध्ये ‘सायमन कमिशनवर’ सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लजपतरायांनी मांडला होता, नोव्हेंबरच्या सुरुवातीस पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचे नेतृत्व केलं, जमाव पांगवण्यासाठी ब्रिटीशांनी मोर्च्यावर लाठीहल्ला केला. लालाजींवरही लाठीहल्ला करण्यासाठी ब्रिटीश जराही कचरले नाही. लाठी हल्ल्यात झालेल्या जबर मारहाणीने १७ नोव्हेंबरला त्यांचा मृत्यू झाला. पण लालाजींचे बलिदान क्रांतीकारकांनी व्यर्थ जाऊ दिले नाही, त्यांच्या बलिदाननंतर स्वातंत्र्याची चवळवळ अधिक प्रकर्षाने वाढू लागली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लालाजींचा जन्म पंजाबच्या लुधियाना जिल्ह्यात धुंढिके गावात २८ जानेवरी १८६५ मध्ये झाला. लहानपाणापासूनच ते अत्यंत हुशार होते. अरबी, उर्दू अशा अनेक भाषांचे त्यांना सखोल ज्ञान होतं. एल्एल्‌. बी. ची पदवी मिळवलेले लालाजी अल्पकाळातच यशस्वी वकील म्हणून नावारुपास आले. बाल विवाह, हुंडा यांना त्यांनी कडाडून विरोध केला. स्त्री शिक्षणाचे ते समर्थक होते. बंगालच्या विभाजनाला लालांजींनी तीव्र विरोध केला.
सायमन कमिशनच्या निषेधार्थ मोठा जमाव लाहोरमध्ये जमला होता. ब्रिटीश पोलीस अधिकारी सांडर्स यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीचार्जचे आदेश दिले यात झालेल्या मारहाणीत लालाजी आजारी पडले आणि काही दिवसांत त्यांच्या मृत्यू झाला. एक महिन्यातच चंद्रशेखर आजाद, भगत सिंह, राजगुरु, सुखदेव यांनी लालाजींच्या हत्येचा बदला घेतला. ब्रिटींशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लालाजींचा वाटाही तितकाच मोठा होता.