शहर कोणतेही असो भटकंती करणाऱ्यांना सर्वाधिक उपयोगाचे अॅप्लिकेशन ठरते ते म्हणजे गुगल मॅप्स. चालत प्रवास असो किंवा वाहतूक कोंडी गुगल मॅप्सचा अपयोग अनेकजण निश्चित स्थळी पोहचण्यासाठी करतात. अॅण्ड्रॉइड स्मार्टफोन वापरणारे जवळजवळ ७० टक्के लोक नियमितपणे गुगल मॅप्सचा वापर करतात. मात्र याच सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अॅप्लिकेशनपैकी एक असणाऱ्या गुगल मॅपबद्दलची एक तक्रार मागील काही दिवसांपासून सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे. विशेष म्हणजे गुगलला टॅग करुन केलेल्या या तक्रारीला गुगलनेही उत्तर दिले आहे.

गुगल मॅपमुळे युझर्सला प्रवासात मदत होते. मात्र ती आणखीन चांगल्या प्रकारे व्हायला हवी असं अनेकांच मत आहे. म्हणजे १० किलोमीटर सरळ जा असं सरसकट सांगण्याऐवजी या दहा किलोमीटरमध्ये असणाऱ्या कोणत्या उड्डाण पुलावरून जाऊन कोणत्या नको, किंवा या १० किलोमीटरमधील इतर माहिती गुगल मॅपवर द्यायला हवी. कारण अशा लहानशी माहिती न दिल्याने प्रवासात मोठा गोंधळ होऊ शकतो. असचं एक ट्विट दिल्लीमधील एका कॉमेडियनने कार्तिक अरोराने केलं. गुगल मॅप्सने शॉर्टकटबद्दलची माहिती मॅप्सवरच द्यावी यासाठी त्याने केलेलं मजेशीर ट्विट चांगलच व्हायरल झालं असून त्याचे स्क्रीनशॉर्टही फिरत आहेत. या ट्विटमध्ये कार्तिक म्हणतो, ‘प्रिय गुगल, एवढे छान नकाशे तुम्ही बनवले. त्यात आणखीन एका छोट्या फिचरचा तुम्ही समावेश करायला हवा. रळ सरळ सांगा ना उड्डाणपूल चढायचा आहे की नाही? पाच इंचाच्या स्क्रीनवर अर्धा मिलीमीटरचे डिफ्लेक्शन कसं काय पाहणार एखादा?’ याखाली त्याने ‘तुमचाच विश्वासू, दोन किलोमीटर पुढे जाऊन युटर्न घेणारा व्यक्ती’, असंही लिहीलं आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Heart touching video of a kid crying and asking mother to come early from work emotional video viral on social media
रडत रडत तिच्याजवळ गेला अन्…, कामावर जाणाऱ्या आईला मुलाची विनवणी, VIDEO पाहून तुमचेही डोळे पाणावतील
Girl claims her bf to be in Delhi Police, tries to threaten fellow passenger during altercation on metro
“माझा बॉयफ्रेंड दिल्ली पोलिस….” दिल्ली मेट्रोत तरुणीची दादागिरी, प्रवासी महिलेबरोबर जोरदार भांडण, Video Viral
What Suresh Dhas Said?
Suresh Dhas : “देवेंद्र फडणवीस यांनी जोर लावावा आणि आकाला..”, संतोष देशमुख हत्याप्रकरणावर काय म्हणाले सुरेश धस?
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर
Manu Bhaker breaks silence on Khel Ratna row
अर्ज भरण्यात माझ्याकडूनच चूक! खेलरत्न पुरस्कार वादावरून मनूचे स्पष्टीकरण
prevent tax evasion without any hesitation dcm ajit pawar s instructions to senior officials
हयगय न करता करचोरी, गळती रोखा; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना निर्देश

कार्तिकचे हे ट्विट खूपच व्हायरल झाले. नऊ हजारहून अधिक जणांनी ते रिट्वीट केले तर २३ हजार जाणांनी ते ट्विट लाइक केले. या ट्विटला आलेल्या रिप्लायवरुन गुगल मॅप्स वापरताना अडचणी येणारा कार्तिक एकटाच नसल्याचेही लक्षात आले. अनेकांनी कार्तिकच्या तक्रारीला पाठिंबा दर्शवत यावर आपली मजेशीर मते मांडली. पाहुयात कोण काय म्हणालं या ट्विटला रिप्लाय करताना…

गुगल मॅप वापरणाऱ्यालाच हे समजू शकते

नजर आणि मन दोन्ही मॅप्सवर ठेवायचे आणि मग…

हे ट्विट सगळ्या भाषांमध्ये भाषांतरित करा

तो न संपणारा उड्डाणपूल

याच ट्विटचं भयंकर गुगल ट्रान्सलेशन पाहा

सर्वांना एकच अडचण

मी हे दुख: समजू शकतो

हे फिचर लवकरात लवकर अॅड करा

९० टक्के वेळा असचं होतं

चला कोणीतरी खरं बोललं

उड्डाणपूल पाहिल्यावर मिनी हार्टअटॅक येतो

मुंबईकर म्हणतो…

अखेर अनेकांनी कार्तिकला पाठिंबा दर्शवल्यावर गुगल इंडियाने कार्तिकला एक मजेशीर रिप्लाय केला. त्यात गुगल इंडिया म्हणते, ‘आम्हाला योग्य रस्ता दाखवणाऱ्या तुमच्या सारख्या युझर्सचे आम्ही आभारी आहोत. (दिवसोंदिवस) उत्तम बनवण्याचा हा प्रवास थांबणार नाही, मित्रा.’

आता इतकी चर्चा झाल्यावर आणि स्वत: गुगलनेही उत्तर दिल्यानंतर खरोखरच गुगल मॅप्समध्ये काही नवीन फिचर्स आणते का याकडे मॅप युझर्सचे लक्ष लागून राहिले आहे.

Story img Loader