मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणारी लोकल ट्रेन कायमच खचाखच भरलेली असते. मुंबईच्या उपनगरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी लोकल ट्रेन सर्वात कमी खर्चिक पर्याय आहे. त्यामुळे शेकडो नागरिक ट्रेननेच प्रवास करतात. मात्र आता मुंबईच्या लोकलसारखी गर्दी असणाऱ्या एका ट्रेनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आता तम्ही म्हणाला मुंबई लोकलसारखी गर्दी इतर कुठे असणार..तर हा व्हिडीओ पाहा.हा व्हिडीओ भारतातील कुठल्या ट्रेनमधला नसून अमेरीकेतील एका ट्रेनमधला आहे. या व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
प्रत्येक जण ठरलेली लोकल पकडण्याचा घाईत असतो. असे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. याच लोकलच्या गर्दीत प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, भारतीय तरुण बाहेरच्या सर्व लोकांसोबत लोकलमध्ये उभा आहे. यावेळी लोकांची गर्दीही दिसत आहे. तेव्हा अचानक हा भारतीय तरुण हिंदीमधून बोलू लागतो. तो दुसरं तिसरं काही न बोलता चक्क हिंदीतून भारतीय रेल्वेच्या सूचना देऊ लागतो. आजूबाजूला असलेल्या प्रवाशांपैकी कुणालाही हा तरुण काय बोलतोय हे कळत नाहीये. मात्र तरुण मोठ-मोठ्यानं बोलत असल्यानं सर्वंच त्याच्याकडे पाहत आहेत.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता हा तरुण चक्क हिंदीमध्ये “ये लोकल दादर से बँड्रा, बँड्रा से अंधेरी और अंधेरीसे बोरिवली के बीच किसीभी स्थानकोपर नही रुकेगी” अशा सूचना देत आहेत.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> VIDEO: “अरे हा तर अंबानीपेक्षा श्रीमंत” या चिमुकल्याच्या गाड्यांचं कलेक्शन पाहून लावाल डोक्याल हात
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, ज्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ @surajmehta05 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. लोक वेगवेगळ्या प्रतिक्रियाही यावर नेटकरी देत आहेत.