Viral Video : सोशल मीडियावर लोक रिल बनवण्यासाठी काय काय करतात, याचा आपण विचारही करू शकत नाही. काही लोक त्यांचे चांगले वाईट अनुभव शेअर करतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला दिसेल की एक तरुणी (व्हिडीओ क्रिएटर) चक्क फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फुकटचं खायला जाते पण जेव्हा तिची चोरी पकडते, तेव्हा जे काही घडते, ते पाहून कोणीही अवाक् होईल. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

या व्हायरल व्हिडीओमध्ये ही व्हिडीओ क्रिएटर तरुणी सांगते, “आज मी फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये फ्रीमध्ये ब्रेकफास्ट करण्याचा प्रयत्न करणार आहे. पाहू या, हे शक्य आहे की नाही. त्यासाठी मी पूर्ण तयारी करून आले. मी नाइट स्युट घातला आहे जेणेकरून मी त्यांची गेस्ट वाटू शकेल.”

तरुणी पुढे सांगते, “ब्रेकफास्ट करण्यासाठी आम्हाला एका रुम नंबरची आवश्यकता होती. जो मी याच हॉटेलच्या ब्लॉकमधून काढला. रुम नंबर मिळाला आहे ३२०६.”
त्यानंतर व्हिडीओत तुम्हाला दिसेल की तरुणी एका कर्मचाऱ्याला विचारते, “नाश्त्यासाठी कुठे जायचं?” जेव्हा कर्मचाऱ्याने सांगितलेल्या ठिकाणी ती पोहचते तेव्हा तिला एक महिला कर्मचारी रुम नंबर विचारते. तेव्हा ती रुम नंबर सांगते, ” ३२०६” आणि ती नाश्ता करायला जाते.

पुढे ती व्हिडीओत सांगते की मला विश्वास बसत नाही की माझा हॅक कामी आलं. मी पकडणार यापूर्वी मी फुकटचा नाश्ता खायला सुरुवात केली आहे. पुढे ती पोटभरून नाश्ता करताना दिसते.

ती पुढे सांगते, “या लोकांनी आयडी मागायला पाहिजे नाहीतर माझ्या सारखे लोक पूर्ण सिस्टिम यांची बिघडवून जाणार.”

तरुणी सांगते, “आम्ही फुकटचा नाश्ता करून जाणार असतो पण तितक्यात..” व्हिडीओत तुम्हाला दिसेल की एक महिला कर्मचारी तरुणीला रूम नंबर विचारते आणि ती रुम नंबर सांगते. त्या रुममधून खरा गेस्ट आल्याने येथे यांची चोरी पकडली जाते. तेव्हा तरुणी त्यांना सांगते की आमचा गैरसमज झाला आम्ही चुकीच्या ठिकाणी आलो आहोत तुम्ही आम्हाला बिल द्या आम्ही भरू. त्यानंतर ती सॉरी म्हणते आणि किती बिल आले ते सांगत म्हणते, “३६५८ रुपयांचा हा ब्रेकफास्ट पडला मला. इतका महागडा ब्रेकफास्ट मी माझ्या आयुष्यात केला नाही जो मी एका तासात आता केला.”

पाहा व्हायरल व्हिडीओ

inishutiwari या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “फुकटचं जेवण महागात पडलं”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “व्हिडीओ पाहून मजा आली” तर एका युजरने लिहिलेय, “एवढे मोठे रिस्क कशाला घ्यायचे” आणखी एक युजरने लिहिलेय, “फुकटचं कशाला खायला जायचं?” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.