सोशल मीडियावर दररोज वेगवेगळे व्हिडीओ शेअर होत असतात. काही व्हिडीओ पाहून भावूक होऊन आपले डोळे पाणावतात, तर काही व्हिडीओ हे अंगावर शहारे आणणारे असतात. असे व्हिडीओ शेअर होताच सोशल मीडियावर व्हायरल होतात. व्हायरल व्हिडीओनंतर काही जण तर एका रात्री सोशल मीडियावरील स्टार बनतात. पण प्रसिद्धी मिळवण्यासाठी काही जण तर आपला जीवही धोक्यात घालायला तयार होतात. असंच जीवघेणं धाडस करणाऱ्या एका तरूणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये एका तरूणाने चक्क वाघासोबत व्हिडीओ काढण्याचं धाडस केलंय.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरूण वाघाजवळ जाण्याचा प्रयत्न करतो. पुढे वाघ चालत येताना दिसतो. जसजसा हा वाघ पुढे चालत येतो तस तसं तो सुद्धा त्याच्या मागोमाग चालत येताना दिसतो. धक्कादायक बाब म्हणजे या तरूणाने वाघाची चक्क शेपूट पडकलेली दिसत आहे. हे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. या तरूणाने वाघाची शेपूट पकडलेली असताना वाघाने मात्र त्या तरूणाला कोणतीच दुखापत केली नाही, हे पाहून सारेच जण गोंधळात पडले. वाघासारख्या भयंकर प्राण्याला एखाद्या पाळीव प्राणी प्रमाणे वागवत हा तरूण चालताना दिसतो.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जातोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केलाय.
“मला मांजरी आवडतात..विशेषतः…जेव्हा त्या मोठ्या असतात…” असं कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आलाय. या व्हिडीओमध्ये वाघ प्रशिक्षित असावा असा अंदाज लावण्यात येतोय. परंतू तरीही वाघासोबत असं कृत्य करण्याचं धाडस कधी कधी अंगाशी येऊ शकतं, असंही काही जण म्हणत आहेत.
आणखी वाचा : Worlds Longest Train: ही आहे जगातील सर्वात लांब पॅसेंजर ट्रेन, जाणून घ्या
इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :
आणखी वाचा : आपल्याच छाव्यांपासून दूर पळू लागला सिंह, पाहा हा गोंडस VIRAL VIDEO
हा व्हिडीओ buffeduplife नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर केलाय. हा व्हिडीओ लोक मोठ्या प्रमाणात शेअर करत असून ३.८ मिलियन पेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला पाहिलंय. तसंच २ लाखांपेक्षा जास्त लोकांनी या व्हिडीओला लाईक केलंय. लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत.