Viral video: भारतीय नागरिक कचऱ्यातून विश्व घडवण्यात चतुर असतात. एखादी वस्तू उपयोगी नाही, असे आपल्या देशात क्वचितच घडते. भारतात जुगाडू लोकांची काहीच कमतरता नाही. भारतीय लोक असे असे जुगाड शोधून काढतात की जे पाहून मोठमोठे इंजिनियर्स आपल्या डिग्र्या फाडतील. सोशल मीडिया विविध व्हिडिओंनी भरलाय. अनेक विनोदी व्हिडिओ आपण इथे रोज पाहत असतो. त्यातले काही व्हिडिओ आपल्याला खळखळून हसवतात. याच प्रकारात येतात जुगाडा व्हिडिओ. स्वत:च डोकं चालवून असं काहीतरी केलं जातं, की मग सोशल मीडियावरचे यूझर्स या जुगाडुंना डोक्यावर घेतात. महिलांकडे तर काही ना काही जुगाड असतातच, ज्यामुळे आपली बरीच डोंगराएवढी मोठी वाटणारी कामं कधी कधी चुटकीशीर होऊन जातात. अशाच एका महिलेनं स्कूटीवरून भलीमोठी बॅग घेऊन जाण्यासाठी खतरनाक जुगाड केलाय. स्कूटी चालवायची की बॅग पकडायची असा प्रश्न पडलेला असताना महिलेनं भन्नाट डोकं लावलंय.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, ही महिला एका हाताने स्कूटर चालवत होती, आणि दुसऱ्या हाताने रस्त्यावर असलेली सुटकेस धरून चाकांच्या मदतीने ती पुढे जात होती. यावेळी तोल जाऊन ही महिला पडण्याची शक्यता आहे मात्र तीनं जे डोकं लावलंय ते पाहून अनेकजण महिलेचं कौतुक करत आहेत. अनेकदा आपल्याकडे खूप सामान असतं आणि ते उचलण्यासाठी सोबत कोणी नसतं अशावेळी फार टेन्शन येतं. अशातच जर स्कूटी असेल तर थोडंफार सामान डिकीमध्ये ठेवता येतं पण त्यालाही मर्यादा. आणि समोर आलेल्या व्हिडीओमध्ये तर ही भलीमोठी बॅग आहे, यावेशी महिलेनं हे भन्नाट डोकं लावलं आहे. व्हिडीओ बघताना असं वाटतं की, ही महिला आता पुढे जाऊन पडणार आहे, मात्र ती शेवटपर्यंत सुखरुप जाताना दिसत आहे. मात्र अशाप्रकारे स्टंट करणं महागात पडू शकतं.

जुगाडपासून बनवलेली अनोखी बाइक

याआधी तुम्ही अनेक वेगवेगळे जुगाड पाहिले असतील मात्र यापेक्षाही खतरनाक जुगाड समोर आला आहे. जुगाड ही आम्हा भारतीयांची वेगळी कला आहे. अशातच एका ग्रामीण भागातील व्यक्तीने जुगाडच्या मदतीने एक अनोखी मोटरसायकल बनवली आहे, ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ही अनोखी बाईक पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हिडीओ

@kaloltheka नावाच्या हँडलने हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक विविध प्रकारच्या कमेंट करत आहेत. एका युजरने लिहिले 

Story img Loader