तुम्ही तुमच्या दैनंदिन कामात व्यस्त आहात आणि तुम्हाला अचानक लॉटरी लागल्याचा फोन आला तर? तीही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल १ कोटी २० लाख रुपयांची. जे कमावण्यासाठी आपल्याला कित्येक वर्षे काम करावे लागेल अशी रक्कम सहजासहजी तुम्हाला मिळाली तर? स्वप्नवत वाटणारी ही गोष्ट सत्यात उतरली आहे. मूळचे केरळमधील असणारे आणि नोकरीच्या निमित्ताने दुबईत राहणारे हरिकृष्णन व्ही. नायर यांचे नशीबच पालटले. सहज म्हणून त्यांनी काढलेली लॉटरी त्यांना तिसऱ्या प्रयत्नात लागली आणि त्यामध्ये त्यांना तब्बल १ कोटींहून जास्त रक्कम मिळाली.

‘बिग टिकट’च्या या लॉटरीसाठी त्यांनी याआधी २ वेळआ प्रयत्न केले होते, मात्र तिसऱ्या प्रयत्नता त्यांचे भाग्य उजळले. नायर २००२ पासून दुबईत राहत असून ते तिथे एका कंपनीत बिझनेस डेव्हपलर म्हणून काम करतात. त्यांना लॉटरी लागल्याचा फोन आला तेव्हा हे खेरी आहे असे त्यांना वाटले नाही. मात्र त्यानंतर त्यांना प्रसारमाध्यमातून फोन यायला लागले. तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीला वेबसाईटवर क्रॉसचेक करण्यास सांगितले. तिनं वेबसाइट पाहिली असता, लॉटरी विजेता म्हणून नाव जाहीर झाल्याची आनंदाची बातमी तिच्याकडून मिळाली, असं नायर यांनी सांगितलं.

अचानक मिळालेल्या इतक्या पैशातून आपण काय करणार असे त्यांना प्रसारमाध्यमांनी विचारले असता, आपल्याला जगाची सफर करायची आहे असे ते म्हणाले. या लॉरीमुळे माझे हे स्वप्न पूर्ण होईल असेही त्यांनी अतिशय आनंदाने सांगितले. याबरोबरच आपल्या मुलाला चांगले उच्चशिक्षण द्यायचे असून भारतात राहणाऱ्या आपल्या आई आणि सासूचा व्यवस्थित सांभाळ करायचा आहे. या पैशातून मी भारतात आणखी एक घर खरेदी करायचे आहे, असं नायर यांनी सांगितलं.

Story img Loader