युद्धाच्या ११ व्या दिवशीही रशियाचे युक्रेनवर हल्ले सुरूच आहेत. दरम्यान, युक्रेनमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना परत आणण्यासाठी, भारत सरकारने आज ‘ऑपरेशन गंगा’ अंतर्गत युक्रेनच्या शेजारील देशांमधून ११ विशेष विमानांद्वारे २,१३५ भारतीयांना परत आणले आहे. २२ फेब्रुवारी २०२२ रोजी विशेष उड्डाणे सुरू झाल्यापासून आतापर्यंत १५,९००हून अधिक भारतीयांना परत आणण्यात आले आहे.

दरम्यान, युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या या युद्धात एका भारतीयासाठी संकट निर्माण झाले आहे. या भारतीयाची कथा थोडी भावनिक आहे. खरं तर, युक्रेनमध्ये दारूगोळ्यांचा पाऊस पडत असताना गगन मोगा यांनी कुटुंबासोबत युद्ध सुरू असलेले शहर सोडले आहे. परंतु युक्रेनच्याच दुसर्‍या शहरात अडकला आहे. तो अडकण्याचे कारण म्हणजे त्याचे कुटुंब. गगनची पत्नी युक्रेनची असून ती गरोदर आहे, मात्र भारताच्या निर्वासन ऑपरेशनमध्ये फक्त भारतीयच मायदेशी परतू शकतात.

Manmohan Singh is the second Prime Minister to visit Deekshabhoomi after Atal Bihari Vajpayee
अटलबिहारी वाजपेयींनंतर दीक्षाभूमीला भेट देणारे डॉ. मनमोहन सिंग दुसरे पंतप्रधान होते
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Marijuana worth Rs 115 crore seized from Mumbai airport in three months
मुंबई विमानतळावरून तीन महिन्यात ११५ कोटींचा गांजा जप्त
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
operation tumor Iraq girl, oral tumor Iraq girl,
मुंबई : दहा वर्षांच्या इराकी मुलीवर तोंडाच्या ट्युमरची यशस्वी शस्त्रक्रिया!
The Ministry of External Affairs (MEA) said it has received a note verbale from Bangladesh interim government
Shaikh Hasina Extradition : “शेख हसीना यांना परत पाठवा”, बांगलादेशची भारताला विनंती; भारताची प्रतिक्रिया काय?
Allu Arjun children whisked away after attack on home
Video: हल्ला झाल्यानंतर पत्नी, मुलांना घेऊन अल्लू अर्जुनने सोडलं घर; त्याचे वडील म्हणाले, “आज आमच्या घरी जे घडलं ते…”
Allu Arjun House Attack
Allu Arjun House Attack : अल्लू अर्जुनच्या घरावर हल्ला, घरात घुसून तोडफोड; आठ जण ताब्यात

नियम आणि कायद्यांमध्ये अडकलेल्या गगनला सध्या युक्रेनच्या दुसऱ्या शहरात ल्विव्हमध्ये राहावे लागले आहे. भारताचे निर्वासन अभियान गंगा ऑपरेशन अंतिम टप्प्यात आहे. अशा परिस्थितीत जीव वाचवण्याच्या धडपडीत अडकलेल्या गगन कुटुंबाला सोडून भारतात परत येऊ शकत नाहीत. गगनच्या म्हणण्यानुसार, “आम्ही मोठ्या कष्टाने बाहेर पडू शकलो. मी बुचा भागात होतो, जो रशियन आणि युक्रेनियन सैन्याचा लढाऊ केंद्र होता. आम्ही दर सेकंदाला गोळीबार आणि बॉम्बस्फोट पाहत होतो.”

दरम्यान यावेळी गगन म्हणाला की, २ दिवसांचा प्रवास करून आम्ही इथे पोहोचलो. त्यातच मी भारतीय आहे आणि माझी पत्नी युक्रेनची आहे, येथून फक्त भारतीयांना बाहेर काढले जात आहे आणि मी माझ्या कुटुंबाला सोडू शकत नाही. माझ्या कुटुंबात मी, माझी पत्नी जी गर्भवती आहे, आम्हाला एक मुलगी आहे आणि माझी सासू असा परिवार आहे. सध्या गगनची प्रकृती ठीक असून, तो युक्रेनमधील लविव्ह येथे राहत आहे.

Story img Loader