Viral Tweet: भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काही दिवसांपूर्वी आफ्रिका खंडातील युगांडा या देशाला भेट दिली. आपल्या देशातील India Exim Bank या बॅंकेने युगांडामध्ये सौर ऊर्जेवर चालणाऱ्या वॉटर सप्लाय सिस्टीम तयार करण्यास सहाय्य केले. ही सिस्टीम सुरु करण्यापूर्वी उद्घाटंनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला एस. जयशंकर उपस्थित होते. त्यांनी ट्विटरवर या कार्यक्रमातील एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओला १० लाखांपेक्षा जास्त व्ह्युज मिळाले. अनेकजण या व्हिडीओखाली कमेंट करत प्रतिक्रिया देत होते. पण या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समधील एका ट्वीटने नेटकऱ्यांचे खासकरुन भारतीय ट्विटर यूजर्सचे लक्ष वेधले आहे. यात युगांडामधील नागरिकाने तंबाखू खाण्यासाठी त्याला एका भारतीय व्यक्तीने कशी मदत केली याबद्दल लिहिले आहे.

ही कमेंट करणाऱ्या तरुणाचे नाव अगाबा असे आहे. ट्विटरच्या बायोमधून तो युगांडामध्ये राहतो असे कळते. अगाबाने जयशंकर यांच्या व्हिडीओच्या कमेंट बॉक्समध्ये त्याच्या भारतीय मित्राबरोबरचा फोटो शेअर केला आहे. त्यावर त्याने “या भारतीय व्यक्तीसह मी मागील ३ महिन्यांपासून काम करत आहे. त्याने तंबाखू पांढऱ्या रंगाच्या पिठाबरोबर (सुनाबरोबर) मिसळून कसा खायचे हे मला शिकवले. हा प्रकार खूप मस्त आहे. तो (भारतीय व्यक्ती) मला माझ्या भावासारखा आहे.” असे लिहिले आहे. तो तरुण चुन्याला सुना/ पांढऱ्या रंगाचे पीठ म्हणत आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

आणखी वाचा – तिच्यासाठी कायपण! या आजोबांनी पुन्हा खरं करून दाखवलं, Video च्या प्रेमात पडाल

हे ट्वीट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोक त्यावरही कमेंट करत आहेत. एका यूजरने भारतातून ही गोष्ट युगांडापर्यंत पोहोचली असे म्हटले आहे. तर अनेकांनी ट्वीटखाली ते चुना असतं सुना नाही अशा कमेंट्स केल्या आहेत. हा फोटो देखील प्रचंड व्हायरल होत आहे. काहीजणांना या फोटोवर देखील मीम्स तयार केले आहेत.

Story img Loader