सोशल मीडियावर कधी-कधी असे व्हिडीओ व्हायरल होतात, जे पाहून तुमचा दिवसभरातला थकवा दूर होतो. असाच एक जबरदस्त डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर गाजतोय. हा व्हिडीओ कितीही वेळा पाहिला तरी कमीच पडेल असा आहे. या व्हिडीओमधल्या व्यक्तीचा डान्स पाहून तुम्ही त्याला ‘देसी मायकल जॅक्सन’ म्हणाल. त्याचे डान्स मुव्ह इतके जबरदस्त आहेत की कुणी प्रोफेशनल डान्सर सुद्धा टक्कर देऊ शकणार नाही. पॉप स्टार मायकल जॅक्सनसारखा डान्स करणाऱ्या या देसी मायकल जॅक्सनचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की, रस्त्यावर एक व्यक्ती पॉप स्टार मायकल जॅक्सनचं सुपरहिट गाणं ‘डेंजरस’वर डान्स परफॉर्मन्स करतो. सुरूवातीला तर या व्यक्तीचा डान्स पाहून तुम्हाला हसू येईल. पण पुढचे त्याचे कमालीचे डान्स मुव्ह्स पाहून प्रत्येक जण हैराण झालाय. या व्यक्तीने देसी आणि मायकल जॅक्सनचे डान्स स्टेप्स एकत्रित करून अफलातून डान्स केलाय. त्याच्यासोबत काही चिमुकले सुद्धा डान्स करताना दिसून आले. काही सेकंदाच्या या व्हिडीओमध्ये एका क्षणासाठी असं वाटू लागतं की एखादा प्रोफेशन डान्सर डान्स करतोय.

पॉप स्टार मायकल जॅक्सनसारखा डान्स करणाऱ्या या व्यक्तीचं नाव फूलचंद मंझवार असं आहे. चाळीस वर्षीय फूलचंद हे छत्तीसगढमध्ये राहणारे आहेत. हा व्हायरल व्हिडीओ पाहून प्रत्येक जण त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत सेल्फी घेताना दिसून येत आहेत. हा व्हायरल व्हिडीओ गेल्या आठवड्यातला असल्याचं सांगण्यात येतंय. फूलचंद यांच्या गावात गणेश विसर्जनाचा कार्यक्रम होता. यावेळी त्यांना हा डान्स परफॉर्म केला होता. विशेष म्हणजे लहान मुलांच्या हट्टामुळे त्यांनी हा डान्स केला होता. हे ती १० वर्षापूर्वी. ज्यावेळी त्यांनी हा डान्स केला त्यावेळी कुणीतरी त्यांच्या कॅमेऱ्यात शूट केलं आणि त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. फूलचंद हे रातोरात सोशल मीडियावरील सेलिब्रिटी बनले. फूलचंद हे त्यांच्या लहानपणापासूनच पॉप स्टार मायकल जॅक्सनचा डान्स टीव्हीवर पाहत होते आणि त्या डान्स स्टेप्स फॉलो करण्याचा देखील प्रयत्न करत होते.

एका माध्यमासोबत बोलताना फूलचंद यांनी सांगितलं की, त्यांना लहानपणापासूनच व्यायामाची आवड होती. पण लोकांना त्यांच्या व्यायामात सुद्धा डान्स दिसत होता. लोकांकडून त्यांच्या डान्सचं होत असलेलं कौतुक पाहून त्यांनी त्यांच्या व्यायामात डान्सचा सुद्धा समावेश केला. त्यानंतर त्यांनी पॉप स्टार मायकल जॅक्सनच्या डान्स स्टेप्स कॉपी करण्यास सुरूवात केली.

आर्थिक परिस्थितीमुळे पावलं मागे घेतली

देसी मायकल जॅक्सन फूलचंद यांनी जवळपास १९ वर्षापूर्वीच डान्सला सुरूवात केली होती. गावात होणाऱ्या डान्सच्या वेगवेगळ्या स्पर्धेत त्यांनी सुरूवातील भाग घेण्यास सुरूवात केली होती. केवळ त्यांच्याकडे पैशांची चणचण होती त्यामूळे ते शहरात जाऊ शकले नाहीत. फूलचंद यांनी केवळ पाचवीपर्यंतचं शिक्षण घेतलंय. त्यांचं शिक्षणात सुद्धा मन लागत नव्हतं. त्यानंतर त्यांचं लग्न झालं आणि डोक्यावरचं डान्सचं भूत उतरलं. दोन वेळचं जेवण मिळवण्यासाठी त्यांनी अखेर वीज मिस्त्रीचं काम स्वीकारलं. सणासुदीच्या दिवसात गणेश मूर्ती आणि दुर्गा मूर्ती बनवण्याचं काम सुद्धा ते करू लागले.

इन्स्टाग्राम रील्सवर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून अनेक युजर्स कमेंट्स सेक्शनमध्ये आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत देसी मायकल जॅक्सनच्या डान्सचं कौतुक करताना दिसून येत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian michael jackson ka video india ka michael jackson viral video google trends today michael jackson of india his dance steps will surprise you omg video went viral prp