दहावी बोर्डाच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळवूनही प्राची निगमची चेहऱ्यावरील केसांवरुन थट्टा करण्यात आली. सोशल मीडियावर तिला खूप ट्रोल करण्यात आले. इतक्या ट्रोलिंगनंतरही प्राचींने स्वत:ला जसे आहे तसे स्विकारले. अनेकांनी तिच्या या निर्णयाचे कौतूक केले. प्राचीची या कठिण परिस्थितीमध्ये अनेकांनी धीर दिला. अशाच एक भारतीय संगीतकाराने प्राचीचे रुप नव्याने खुलवले आहे.
अनिश भगतने इंस्टाग्रामवर प्राचीबरोबर शुट केलेला एक व्लॉग शेअर केला आहे, “आशा करतो की हे ट्रोलर्संना एकदाची आणि कायमची शांतता मिळेल.” अनिशच्या व्लॉगमध्ये तो आपल्या घरातून प्राचीच्या मूळ गावी, उत्तर प्रदेशातील महमुदाबाद येथे पोहचण्यापर्यंता प्रवास सुरुवातीला दाखवला आहे. त्यानंतर हातात फुल घेऊन त्याने तिचे स्वागत केले. इयत्ता दहावी बोर्डाच्या परीक्षेनंतर प्राचीचा फोटो व्हायरल आहे. प्राचीसमोर आलेल्या आव्हानांवर त्याने प्रकाश टाकला.मुख्यतः तिच्या दिसण्याबाबत ज्या गोष्टी तिला सहन कराव्या लागल्या त्याबाबत चिंता व्यक्त केली. प्राचीला ट्रोल करणाऱ्यांना प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न अनिशने केला आहे. अनिशने प्राचीचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला आहे.
व्हिडिओ पाहून ट्रोल करणाऱ्यांना नक्कीच धक्का बसू शकतो. मेकओव्हर तिचे रुप पाहून अनेक जण थक्क होतील. तुम्हाला असे वाटत असेल की अनिशने प्राचीला चेहऱ्यावरील केस काढून तिचा मेकओव्हर केला असेल तर तुम्ही चुकीचे आहात. अनिशने प्राचीचा मेकअप नक्कीच केला पण तिच्या चेहऱ्यावरील केस काढले नाही. प्राची आजही जशी आहे तशीच दिसते. पण स्वत:ला आहे तसे स्विकारण्याचा आत्मविश्वास मात्र अनिशने प्राचीला दिला आहे. हेच प्राचीला ट्रोल करणाऱ्यांसाठी चोख प्रत्युत्तर आहे. व्हिडीओमध्ये प्राचीने चांगला संदेश दिला, “प्रिय महिलांनो, जे कधी तुटले ते जोडण्याचा प्रयत्न करू नका. येथे ती महिलांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की, जी गोष्ट मुळात सुंदर आहे तिला सुंदर करण्याचा प्रयत्न करू नका.”
हेही वाचा – Mount Everestवर बर्फाने वेढलेल्या पर्वतामध्ये लांबच लांब रांगेत अडकले गिर्यारोहक, Video Viral
हा व्हिडीओ नेटकऱ्यांना प्रचंड आवडला. अनेकांनी इंटरनेटवर भावनिक प्रतिसाद दिला. पत्रकार नयनदीप रक्षित यांनी कबूल केले, “ज्या क्षणी तू म्हणालास की मला तिला ‘ग्लो’ करायचे आहे, तेव्हा मला जवळजवळ त्रास झाला. फक्त व्हिडीओ पाहिल्यानंतर मी खूप आनंदी आहे.” “मेकअप करण्याऐवजी तु तिला जशी आहे तशी ठेवून तिला ती सुंदर आहे याची जाणीव करून दिली हे मला आवडते…” दुसरा म्हणाला. तर तिसरा म्हणाला, “‘जे कधीही तुटलेले नाही ते दुरुस्त करण्याचा प्रयत्न करू नका’ काश मला हे कोणी मोठे होताना सांगितले असते.
अनेकांनी अनिशच्या या कृतीचे सोशल मीडियावर कौतुक केलआहे. “भावा, त्याने तिचे दुखावलेले मनं बरे केले,”असे म्हणत एका वापरकर्त्याने त्याचे कौतुक केले. “या व्यक्तीच्या आई-वडिलांनी त्याला या जगात आणून सर्वात मोठे काम केले आहे,” दुसऱ्याने म्हटले. तिसरा म्हणाला, “अनीश या रीलमध्ये तू आम्हा स्त्रियांना किती बरे करतो आहेस याची तुला कल्पना नाही.”
खरंच, आपल्या विचारपूर्ण कृतीने अनिशने प्राचीसाठी केलेल्या प्रयत्नातून दाखवून दिले की इंटरनेटवर कितीही ट्रोल करणारे असले तरी येथे काही दयाळूपणा आणि सक्षमीकरण करणारे देखील असू शकतात.
© IE Online Media Services (P) Ltd