न्यूझीलंड क्रिकेटने (एनझेडसी) सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली. अचानक दौरा रद्द केल्याने यामागे नेमके काय कारण होते, याबद्दल बराच ऊहापोह करण्यात आला. न्यूझीलंडच्या वतीने अधिकाऱ्यांकडून कोणतेही ठोस विधान करण्यात आले नसले तरी, दहशतवादाच्या मुद्यावर जगभरात अपमानाला सामोरे जाणाऱ्या पाकिस्तानने आता या मुद्द्यावर भारताकडे बोट दाखवले आहे. भारताकडून दहशतवादी हल्ल्याबाबत धमकी देणारा ई-मेल पाठवण्यात आल्यानंतर न्यूझीलंडने हा दौरा रद्द केल्याचा पाकिस्तानचा आरोप आहे. या मध्ये एका रॅपरचे नावही घेण्यात आलं आहे.
पाकिस्तानचे माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी बुधवारी आरोप केला की भारताकडून न्यूझीलंड क्रिकेट संघाला धमकीचा ईमेल पाठवण्यात आला होता, ज्यामुळे न्यूझीलंडला त्यांचा दौरा रद्द करण्यास प्रवृत्त केले होते. फवाद चौधरी यांनी पत्रकार परिषदेत दावा केला की ओम प्रकाश मिश्राने हा धमकीचा मेल पाठवला होता. ओम प्रकाश मिश्राने मार्टिल गुप्टिलच्या पत्नीला हा मेल पाठवला होता ज्यामुळे पाकिस्तान न्यूझीलंड मालिका रद्द झाली.
एका पत्रकार परिषदेत पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी भारतावर आरोप करत ओम प्रकाश मिश्रा या रॅपरचेही नाव घेतले. ओम प्रकाश मिश्रा हा २०१७ मध्ये त्याच्या एका विचित्र रॅप ‘आंटी की घंटी’ साठी चर्चेत आला होता. त्यानंतर ज्या ओम प्रकाश मिश्रा लोक जवळजवळ विसरले होते तो पाकिस्तानच्या मंत्र्यामुळे पुन्हा चर्चेत आला आहे. ट्विटर नेटकऱ्यांनी ओमप्रकाश मिश्राच्याच शैलीत पाकिस्तानवर टीका केली आहे. ट्विटरवर आलेल्या या प्रतिक्रिया पाहून तुम्हालाही हसू आवणार नाही.
बोलना इमरान आऊं क्या
त्याची गाणी जितकी बिनडोक आहेत तितकेच फवाद चौधरी आणि पाकिस्तान सरकारचे हे विधान आहे
ऑस्ट्रेलियन क्रिकेट पत्रकार डेनिस फ्राइडमन यांनीही पाकिस्तानी मंत्र्यांच्या वक्तव्यावर टीका केली
ओम प्रकाश मिश्राला आता अतिरिक्त सुरक्षेची गरज
अब हमको चाहिए फुल्ल इज्जत
पाकिस्तानातील काही दहशतवादी हल्ल्यामागे भारताचा हात असल्याचा दावा पाकिस्तान करत आहे. भारताने हे दावे निराधार असल्याचे फेटाळून लावले आणि इस्लामाबादला त्यांच्या भूमीवर वाढणाऱ्या दहशतवादाच्या विरोधात कारवाई करण्यास सांगितले होते.