ब्रिटनस्थित ‘ग्लोबल जस्टीस नाऊ’ या कंपनीने जगातील बलाढ्य अशा १०० कंपन्यांची यादी प्रसिद्ध केली आहे. या कंपन्याचे उत्पन्न इतके आहे की विकसित पासून ते अविकसनशिल प्रकारातील काही देश ते सहज विकत घेऊ शकतील. विशेष म्हणजे या कंपनीत भारताची सरकारी कंपनी इंडिअन ऑईलचा देखील समावेश आहे. ग्लोबल जस्टीन नाऊने केलेल्या सर्वेक्षणात इंडियन ऑईलचे वार्षिक महसूल उत्पन्न हे ५४. ७ अब्ज डॉलर इतके आहे आणि हे उत्पन्न पाकिस्तानपेक्षा ४० टक्क्यांनी अधिक आहे. पाकिस्तान या देशाचे महसूल उत्पन्न फक्त ३८.७ अब्ज डॉलर इतकेच आहे.
तर ‘वॉलमॉर्ट’, ‘अॅपल’, ‘शेल’ यासारख्या कंपन्यांचे महसूल उत्पन्न हे जगातील १८० गरीब देशांपेक्षाही अधिक असल्याचे त्यांच्या सर्वेक्षणात आढळून आले आहे. ग्रीस, आर्यलँड, इस्त्राइल, दक्षिण आफ्रिका, व्हिएतनाम, कंबोडिया या देशांचे वार्षिक महसूल उत्पन्न हे एकत्र केले तरी या कंपन्यांएवढे नसेल असेही म्हटले आहे. त्यामुळे मनात आणले तर या बलाढ्य कंपन्या सहज हे देश विकत देखील घेऊ शकतील. या सर्वेक्षणातील पहिल्या दहा कंपन्यांचे वार्षिक महसूल उत्पन्न हे एकत्र केले तर चीनच्या अर्थव्यवस्थेपेक्षाही अधिक निघेल असेही यात सांगण्यात आले. विशेष म्हणजे यात वॉलमार्ट हि सगळ्यात श्रीमंत कंपनी असल्याचे म्हटले आहे. ही कंपनी तर ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि आर्यलँड या देशापेक्षाही श्रीमंत आहे.