प्रत्येकाला जगभर फिरण्याची आवड असते. कित्येक जण आपलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करत असतात. कित्येक जण हे स्वप्न पाहता पाहता वयस्कर होत असतात पण एका १० वर्षाच्या मुलीने मात्र हे स्वप्न जगलं आहे. १० वर्षाच्याअदिती त्रिपाठीने इतक्या कमी वयामध्येही आपल्या आई-वडिलांसह ५० देशांची सफर पूर्ण केली आहे तेही एकही दिवस शाळा न बुडवता. तुम्ही म्हणाल हे कस शक्य आहे? पण ही अशक्य वाटणारी गोष्ट ही चिमुकलीने शक्य करून दाखवली आहे. कसे ते जाणून घेऊ या.

याहू लाइफ यूके अनुसार, अदिती आपले वडील दिपक आणि आई अविलाशासह साऊथ लंडनमध्ये राहते, तिने जवळपास संपूर्ण यूरोप सफर पूर्ण केली आहे एवढंच नव्हे तर तिने नेपाळ, सिंगापूर आणि थायलंड सारख्या ठिकाणांना देखील भेट देऊन आली.

Aditi Tripathi (photo- deepak.tripathi.5205)
१० वर्षाच्या अदिती त्रिपाठीने ५० देशांची सफर पूर्ण केली आहे

अदितीच्या पालकांनी असे घडवून आणले सर्व

मिळालेल्या माहितीनुसार, अदितीच्या आईवडिलांनी आधीच ठरवले होते की, ”आपल्या मुलीने एक चांगली प्रवास करणारी व्यक्ती व्हावे त्यांची इच्छा होती की, ”तिने शालेय अभ्यासाचे नुकसान न करता, जगभर फिरावे आणि विविध संस्कृती, खाद्य पदार्थ आणि लोकांना समजून घ्यावे. त्यासाठी त्यांनी एक प्लॅन आखला होता आणि शालेय सुट्ट्यांमध्ये प्रवास करण्यासा सुरुवात केली. इतकंच नव्हे तर बँकेच्या सुट्ट्यांचा वापर करण्यासही सुरुवात केली. अदितीच्या पालकांच्या मते, ते प्रवासावर दरवर्षी २०,००० पाऊंड ( २० लाख रुपयांपेक्षा जास्त ) खर्च करतात. पण त्यांच्या मते या पैशांचा त्यांनी पुरेपुर फायदा घेतला आहे.

याहू लाइफ यूकेला त्रिपाठी यांनी सांगितले की, नेपाळ, भारत आणि थायलंड सारख्या विविध संस्कृती पाहून उत्सूक आणि उत्साहित होतात. जेव्हा तीन वर्षाची होती तेव्हा त्यांनी त्याच्यासह प्रवास करण्यास सुरुवात केली आणि ते प्रत्येक आठवड्याला अडीच दिवस शाळेत जात नव्हती.

हेही वाचा – बापरे! ३ वर्षाच्या मुलाने चुकून स्वतःला केले कारमध्ये लॉक, वडिलांनी ‘असा’ वाचवला जीव; पालकांना दिला मोलाचा सल्ला

Aditi Tripathi (photo- deepak.tripathi.5205)
एकही दिवस शाळा न बुडवता कसा केला अदितीने प्रवास

एकही दिवस शाळा न बुडवता कसा केला अदितीने प्रवास

तो पुढे म्हणाला, “आता आम्ही तिला शुक्रवारी थेट शाळेतून घेऊनत जात असे आणि रविवारी रात्री उशिरा रात्री ११ च्या सुमारास विमानाने परत येत असे. कधीकधी आम्ही सोमवारी सकाळी पोहोचतो आणि ती थेट विमानतळावरून शाळेत जाते असे.”

मेट्रोच्या म्हणण्यानुसार, अदितीचे पालक अकाउंटंट म्हणून काम करतात आणि ते वर्षभर त्यांच्या सहलींसाठी बचत करतात. ते बाहेर खाणे टाळतात, सार्वजनिक वाहतुकीवर अवलंबून असतात, स्वतःची कार नाही आणि अदितीची २ वर्षांची बहीण अद्विताचा प्रवास आणि मुलांच्या संगोपनाचा खर्च वाचवण्यासाठी ते घरातूनही काम करतात.

त्रिपाठी यांनी स्पष्ट केले की, ”कोविडपूर्वी ते एका वर्षात सुमारे १२ ठिकाणी फिरत असे. तिचे वय कमी असूनही, अदितीने युरोपमधील जवळजवळ प्रत्येक देश, तसेच थायलंड, इंडोनेशिया आणि सिंगापूरला भेट दिली आहे.”

हेही वाचा – Optical Illusion : ‘या’ फोटोत खरचं एक मांजर आहे, पण कुठे? तेच तर शोधयाचे तेही फक्त १० सेंकदात!

Aditi Tripathi (photo- deepak.tripathi.5205)
भारतीय वंशाच्या १० वर्षांची अदिती त्रिपाठी जगभर फिरतेय

तीन वर्षाची असल्यापासून करते प्रवास

याहू लाइफ यूकेला अदितीने सांगितले की, माझा कोणता आवडता देश किंवा ठिकाण नाही. पण मला जर तीन निवडण्यास सांगितले तर मी नेपाळ जॉर्जिया, आर्मेनिया निवडेल. नेपाळ माझ्या आवडीच्या ठिकाणांपैकी एक आहे कारण तिथे मी घोड्यावर स्वार झाले होते, तिथेमी सर्वात उंच केबल कारवर चालले होते आणि माऊंट एवरेस्ट देखील पाहिला होता. मला प्रत्यक्षात प्रवास करायला आवडते. माझ्याकडे जगभरातील मजेशीर आठवणी आहे. मी इतर मुलांना असे करा असे सांगेल कारण हे खरचं तुमचे सामाजिक कौशल्य वाढवण्यास मदत करते.

अदितीने फक्त तीन वर्षांची असताना सर्वात पहिली सफर जर्मनीला केली होती. प्रथमच प्रवासाने प्रेरित होऊन, त्यांनी लवकरच फ्रान्स, इटली आणि ऑस्ट्रियालाही भेट दिली.

Story img Loader