व्यवसाय करण्यासाठी जसं आर्थिक भांडवल गरजेचं आहे, तसंच योग्य बुद्धीचं भांडवलदेखील तितकंच गरजेचं आहे. हा फंडा वापरून ब्रिटनमधल्या १९ वर्षीय भारतीय वंशांच्या तरुणाने व्यवसाय सुरू केला आणि केवळ १६ महिन्यांच्या अवधित तो ब्रिटनमधला सर्वात तरुण कोट्यधीश बनला.

अक्षय रुपारेलिया असं त्यांच नाव असून दीड वर्षांपूर्वी त्याने ‘डोअरस्टेप डॉट को डॉट यूके’ ही ऑनलाइन वेबसाईट सुरू केली. या वेबसाईटमार्फत तो मालमत्ता विक्रीचा व्यवसाय करतो. वेबसाईट सुरू झाल्यानंतर अल्पावधीतच त्याने चांगली प्रगती केली आणि बघता बघता ब्रिटनमधल्या सर्वोत्तम १८ मालमत्ता खरेदी विक्री करणाऱ्या कंपनीत त्याचा कंपनीचा सामावेश झाला. सध्या अक्षयच्या कंपनीत १२ कर्मचारी काम करतात. सुरुवातीला सहा लाख रुपये आपल्या नातेवाईंकांकडून कर्जाऊ घेत त्याने व्यवसायाची सुरूवात केली. शाळेत असताना त्याने लंडनमधल्या एका ग्राहकाचे घर तीन आठवड्यात विकून दाखवले होते. तेव्हापासून अक्षयच्या नावाची चर्चा होऊ लागली. अक्षयचे आई वडिल दोघंही कर्णबधीर आहे, त्याची आई शिक्षिका असून ती कर्णबधीर मुलांना शिकवते.

वाचा : जाणून घ्या #MeToo हॅशटॅग का होतोय ट्रेंड

वाचा : ‘या’ देशाचे पंतप्रधान राजाला भेटायला सायकलवरून जातात

‘रायन एअर’चे संस्थापक मिशेल ओलोरी यांचे आत्मचरित्र वाचल्यानंतर अक्षयला व्यवसायाची कल्पना सुचली. शाळेत असताना त्याने ओलोरींचे आत्मचरित्र वाचले होते. सर्वात कमी किंमतीत विमानप्रवासाची सेवा त्यांनी देऊ केली. अक्षयने ऑक्सफर्ड विद्यापीठात अर्थशास्त्र आणि गणित विषयचाचे शिक्षण सुरू होते. पण व्यवसायाचा वाढता व्याप लक्षात घेऊन त्याने आपलं शिक्षण अर्धवट थांबवलं आहे.

Story img Loader