स्तनपानासंदर्भात आजही भारतामध्ये फार जपून बोललं जातं. त्यातही आपल्याच बाळाला भूक लागल्यावर सार्वजनिक ठिकाणी असणाऱ्या भारतीय महिलांना तर आधी कुठे सुरक्षित जागा शोधू स्तनपानासाठी असा प्रश्न पडतो. मात्र स्तनपानासंदर्भातील भारतीयांचे विचार हळूहळू बदलत आहेत. हल्ली रेल्वे स्थानकं, विमानतळांवर स्तनपानासाठी विशेष रुमची सोय केल्याचंही दिसून येतं. स्तनपानासंदर्भात उघडपणे भूमिका घेण्यात आणि त्यामध्ये लाजण्यासारखं किंवा गौण वाटण्यासारखं काहीच नाही असा संदेश देण्याचं काम सेलिब्रिटींच्या माध्यमातूनही केलं जातं. असाच एका गायिकेचा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

लोकप्रिय गायिका चिन्मयी श्रीपदाने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या जुळ्या मुलांना एकाचवेळी स्थनपान करत असल्याचा फोटो पोस्ट केला आहे. चिन्मयीला जुळी मुलं असून यापैकी एक मुलगा तर दुसरी मुलगी आहे. काही महिन्यापूर्वीच चिन्मयी आणि तिचा पत्नी राहुल रविंद्रन आई-बाबा झाले.

चिन्मयीने आपल्या मुलांना एकाच वेळी स्तनपान करतानाच फोटो पोस्ट करताना या फोटोंना एक भन्नाट कॅप्शन दिली आहे. श्रवास आणि द्रीपदा अशी चिन्मयीच्या मुलांची नावं आहेत. “एकाच वेळी दोघांना भरवणं हे असं असतं. ही जगातील सर्वात उत्तम गोष्ट आहे,” असं कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. तसेच पुढे, “मात्र माझ्या पाठीचं आणि खांद्यांचं वेगळच काहीतरी म्हणणं आहे,” असंही म्हटलं आहे. या फोटोला सव्वा लाखांहून अधिक लाइक्स आहेत. अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोवर कमेंट केली आहे.

चिन्मयीने चाहत्यांच्या प्रतिक्रियांना उत्तरं देताना मुलांचा जन्म आयव्हीएफ तंत्रज्ञानाने झाला आहे का याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे. “तुमच्या प्रतिक्रिया आणि भावना मी समजू शकते. आम्हाला जुळी मुलं आहेत. मला अनेकदा ही मुलं आययूआय किंवा आयव्हीएफच्या माध्यमातून झाली आहेत का यासारखे प्रश्न विचारले जातात. यासंदर्भात लोकांना कुतूहल का आहे किंवा प्रश्न का पडतो अथवा मुलं कशी तयार होतात हे का जाणून घ्यायचं असतं. ते या पद्धतीवरुन समोरच्याबद्दल मतं कशी बनवतात. आई ही आई असते. आई होण्याचा प्रवास सोपा नसतो. त्यातही जुळ्यांना संभाळणं ही कठीण गोष्ट आहे. लोकांनी समजूतदार होण्याची गरज आहे. मोठे व्हा आणि शांतते जगा इतरांच्या आयुष्यात लुडबूड थांबवा,” असं चिन्मयीने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

मुलांचा जन्म झाल्यानंतर दुसऱ्याच पोस्टमध्ये चिन्मयीने मुलांचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाल्याचं चाहत्यांना सांगितलं होतं.