भारतीय नौदल दिवस ४ डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळपासूनच ट्विटवर #IndianNavyDay हा हॅटॅशग ट्रेण्ड होताना दिसत होता. सामान्यांबरोबरच अनेक बड्या नेत्यांनीही नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मात्र यापैकी अनेक नेत्यांनी भारतीयांना भारतीय नौदलचा अभिमान वाटतो असे सांगताना चक्क अमेरिकन नौदलातील युद्धनौकांचे फोटो ट्विट केले आहेत. ही चूक करणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने भाजपाच्या नेत्यांचा समावेश आहे. झालेली चूक नेटकऱ्यांनी लक्षात आणून दिल्यानंतरही या पोस्ट सोशल मिडियावरून डिलीट करण्यात आलेल्या नाहीत.
भारतीय नौदल दिनाच्या शुभेच्छा देताना अमेरिकन युद्धनौकेचे फोटो ट्विट करणाऱ्या नेत्यांची यादी मोठी आहे असचं म्हणावं लागेल. यामध्ये राज्य मंत्रीमंडळाचे सदस्य असणारे भाजपाचे नेते प्रकाश मेहता, आसामचे मुख्यमंत्री आणि भाजपा नेता सर्बानंद सोनोवाल आणि भाजपाच्या मध्यप्रदेशमधील खासदार रिती पाठक या नेत्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचाही समावेश चुकीचा फोटो ट्विट करणाऱ्या नेत्यांमध्ये आहे. तुम्हीच पाहा त्यांचे ट्विटस…
प्रकाश मेहता
Salutations to the Indian Naval Personnel for their effort and Fearless contribution towards Nation on this Indian #NavyDay #IndianNavy pic.twitter.com/fkaY3FdlT5
— Prakash Mehta (@bjpprakashmehta) December 4, 2018
सर्बानंद सोनोवाल
Salutations to all naval personnel for their invincible spirit and devotion with which they serve and protect our motherland. #NavyDay @indiannavy pic.twitter.com/EWrwFYD7WQ
— Sarbananda Sonowal (@sarbanandsonwal) December 4, 2018
रिती पाठक
अदम्य साहस और निष्ठा से राष्ट्रसेवा में समर्पित भारतीय नौ सैनिको को नमन् एवं आप सभी को नौसेना दिवस की हार्दिक शुभकामनाएँ। #NavyDay pic.twitter.com/GuIraqrzF6
— Riti Pathak (@RitiPathakSidhi) December 4, 2018
जयंत पाटील
On this 46th #NavyDay, let us salute the exemplary valour & courage of the #IndianNavy personnel and their selfless service & sacrifices to the motherland.
Happy Indian Navy Daypic.twitter.com/xtvps2DKVL— Jayant Patil (@Jayant_R_Patil) December 4, 2018
कोणते आहे हे जहाज
अनेक नेत्यांनी भरतीय नौदल दिनानिमित्त दिलेल्या शुभेच्छांसाठी वापरलेला फोटो हा अमेरिकन नौदलातील फ्रीडम प्रकारातील लिटलॉर शैलीच्या युद्धनौकेचा आहे. या युद्धनौकांचा २००५ सालामध्ये अमेरिकन नौदलामध्ये समावेश करण्यात आला आहे.