Indian Railway Seats: भारतीय रेल्वे वेळोवेळी चर्चेत असते. काहीवेळा कौतुक म्हणून तर बहुतांश वेळा तक्रारींसाठी प्रवासी ट्विटर सारख्या माध्यमातून रेल्वेपुढे आपली व्यथा मांडत असतात. सध्या मुख्तार अली या एका ट्विटर युजरने भारतीय रेल्वेकडे अशीच एक गंभीर तक्रार केली आहे. त्याच्या ट्वीटनुसार तुटलेल्या सीटच्या हँडलमुळे त्यांच्या नितंबाच्या व ट्राऊजरचे नुकसान झाले असे समजत आहे. त्याने या तुटलेल्या खुर्चीचा फोटो सुद्धा शेअर केला आहे. यासह त्याने लिहिले की, “हे बघा, 15036 सीट क्रमांक 29 C2 च्या तुटलेल्या हॅन्डलने माझ्या नितंब आणि ट्राउझरचे नुकसान झाले आहे. कृपया हे दुरुस्त करा हे खूप धोकादायक आहे,”
तक्रारीला उत्तर देताना, रेल्वे सेवेने सांगितले की त्यांनी इज्जतनगर विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयातील संबंधित अधिकाऱ्याकडे ही तक्रार पाठवली आहे. तसेच रेल्वेने या ट्वीटला उत्तर देत, “कृपया तुमचा PNR/UTS तपशील आणि मोबाईल नंबर शेअर करा. शक्यतो DM द्वारे जेणेकरुन आम्ही ती तक्रार म्हणून नोंदवू. तुम्ही तुमची तक्रार थेट railmadad.indianrailways.gov.in वर देखील मांडू शकता किंवा जलद निवारणासाठी 139 डायल करू शकता,” असेही लिहिले आहे.
Photo: तुमच्या सीटमुळे माझे नितंब दुखले म्हणत…
हे ही वाचा<< ‘हा’ जुगाडू Video पाहून तरुणाला गूगलने जॉब इंटरव्ह्यूला बोलवलं! लोकं म्हणतात, “इंटरनेट बंद झालं आणि नशीब…”
दुसरीकडे, अन्य एका ट्विटर युजरने ट्रेनमध्ये डाळ, भात, भाजी आणि पोळ्या असलेल्या तिच्या अर्धवट जेवणाचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या कॅप्शनमध्ये तिने रेल्वे अधिकाऱ्यांना म्हंटले की, “IRCTC तर्फे दिले जाणारे हे अन्न तुम्ही कधी स्वतः खाऊन पाहिले आहे का? तुम्ही तुमच्या स्वतःच्या कुटुंबाला आणि मुलांना अशी वाईट गुणवत्ता आणि चव असलेले अन्न कधी द्याल का? हे कैद्यांचे जेवण आहे” दरम्यान तक्रारींवर रेल्वेतर्फे प्रतिसाद जरी लवकर येत असला तरी त्यावर सुधारणा कधी होईल हे पाहणे महत्त्वाचे आहे.