EMU Video Goes Viral On Internet : भारतीय रेल्वे प्रवासादरम्यानचे अनेक धक्कादायक व्हिडीओ समोर असतात. यात कधी रेल्वेच्या जेवणात अळ्या आढळतात तर कधी रेल्वेचे छत गळत असते. काहीवेळी तर प्रवाशांना मोठ्या त्रासाचा समान करावा लागतो. यात आता EMU ट्रेनमधील एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ शकूरबस्ती (दिल्ली) ते पलवला (हरियाणा)जाणाऱ्या EMU ट्रेनच्या बोगीतील असल्याचे सांगितले जात आहे. या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या एका बोगीतील खालचा एक पत्र पूर्णपणे निघालेला दिसत आहे, यामुळे धावत्या ट्रेनच्या चाकांचा वेग आणि ट्रॅक स्पष्टपणे दिसत आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एका प्रवाश्याने ट्विटरवर हा व्हिडीओ पोस्ट करत म्हटले की, जर चुकून कोणत्या प्रवाश्याचा किंवा लहान मुलाचा पाय यात पडला तर अपघात निश्चित आहे. यानंतर रेल्वेने या प्रकरणावर तातडीने दखल घेत समस्या सोडवली आणि ट्विट करत म्हटले की, गैरसोयीबद्दल क्षमस्व. तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे. मात्र यावरून ट्विटर युजर्स रेल्वे प्रशासनावर टीका करत आहेत.

ट्विटरवर हा व्हिडीओ सुरज सिंग (@SurajSolanki) अकाउंटवर पोस्ट करण्यात आला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, प्रवाश्यांचा जीव धोक्यात! ट्रेनच्या बोगीतून दिसणारी फिरती चाकं. एखाद्या प्रवासी किंवा मुलाचा पाय चुकून जर यात पडला तर अपघात निश्चित आहे. आज @RailMinIndia च्या 04410 शकूरबस्ती ते पलवला जाणाऱ्या EMU ट्रेनच्या पहिल्या डब्यातील हे दृश्य आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव @AshwiniVaishnaw जी, दखल घ्या.

या प्रकरणावर ‘रेल्वे सेवा’ (@RailwaySeva) ने उत्तर दिले की संबंधित अधिकाऱ्यांना सूचित केले जात आहे. यानंतर DRM Delhi NR च्या वतीने हे ट्विट करण्यात आले. त्यांनी लिहिले की- गैरसोयीबद्दल क्षमस्व. तक्रारीचे निराकरण करण्यात आले आहे.

या ट्विटला आतापर्यंत १४ हजारांहून अधिक व्ह्यूज आणि २५० हून अधिक लाईक्स मिळाले आहेत. तसेच अनेक युजर्सनी त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. एकाने लिहिले – भारतीय रेल्वे हे विकासाचे चाक आहे. दुसर्‍याने लिहिले की, साहसाची अनुभूती देण्यासाठी यावर काच लावण्याचा प्लॅन आहे.