बहुतांश प्रवाशांना रेल्वेने प्रवास करताना खूप भूक लागते. यात घरुन कितीही खायला आणले तरी रेल्वेत मिळणारे अनेक चटपटीत पदार्थ खाल्ल्याशिवाय मन भरत नाही. यात रेल्वेत मिळणारे असे काही पदार्थ आहेत ज्यांचा स्वाद त्याचवेळी घेण्यात वेळीच मज्जा असते. जसे की, वडापाव, चहा, भेळ आणि इतर अनेक चटपटीत पदार्थ. रेल्वेत अनेक प्रवासी भेळ आवडीने खातात. कांदा, मिरची, मसाला, चिवडा, शेव, कुरमुरे टाकून बनवलेली रेल्वेतील चटपटीत भेळ खावून पोट भरल्यासारखे वाटते. पण सोशल मीडियावर भारतीय रेल्वेतील भेळचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे तो पाहून तुम्ही भेळ खाणं कायमचं विसरुन जाल. हा व्हिडीओ पाहून रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे.
रेल्वेतील खाद्य विक्रेता घाणेरड्या ठिकाणी ठिकाणी ठेवलेले पदार्थ प्रवाश्यांना विकून त्यांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रेल्वेतील टॉयलेट सीटच्या बाजूला एका विक्रेत्याने भेळची भरलेली टोपली ठेवलेली दिसत आहे.
भारतीय रेल्वेतील किळसवाणा प्रकार
ट्रेनमधून प्रवास करताना आपल्याला अनेक भेळ विक्रेते भेळ, भेळ करुन ओरडताना दिसतात. प्रवासी देखील ती चटपटीत भेळ ताव मारुन खातात. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही रेल्वेतील भेळचं नाही तर इतर कोणतेही पदार्थ खाताना १०० वेळा विचार कराल. तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता, रेल्वेतील एका टॉयलेटमध्ये एका भेळ विक्रेत्याने खाद्यपदार्थांनी भरलेली टोपली ठेवलेली आहे. ह्या टोपलीतील सर्व पदार्थ असेच उघडे ठेवले आहे. रेल्वेतील टॉयलेटमधील अस्वच्छता दुर्गंधी तुम्हाला माहितचं असेल. तरीही विक्रेत्याने कसलाही विचार न करता अतिशय अस्वच्छ ठिकाणी ही भेळची टोपली ठेवली आहे. तुम्ही विचार करा, जर टोपलीतील या पदार्थांपासून बनवलेली भेळ खाल्ल्यावर तुमच्या आरोग्याचं काय परिणाम होऊ शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कदाचीत आता रेल्वेतील भेळ खाणं सोडून द्याल.
रेल्वेत मिळणारी भेळचं नाहीत अनेक खाद्यपदार्थ अस्वच्छ वातावरणात बनवले जातात किंवा ठेवले जातात याचे व्हिडीओ तुम्ही यापूर्वी पाहिलेच असतील. हे पदार्थ खाल्ल्याने प्रवाशांना फूड पॉयझनिंग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या होऊ शकतात. पण तरीही अनेक प्रवासी भूक भागवण्यासाठी हे पदार्थ खातात. पण जेव्हाही तुम्ही ट्रेनने प्रवासाला कराल तेव्हा घरूनच सर्वकाही बनवून नेण्याचा प्रयत्न करा. पण हा व्हिडीओ पाहून नेटकरी संबंधीत भेळ विक्रेत्यावर कारवाईची मागणी करत आहे.