Indian Railway Heart Touching Viral Video : रेल्वे रुळ ओलांडताना अनेकदा भीषण अपघाताच्या घटना घडतात हे आपण पाहिले आहे. यामुळे रेल्वेकडूनही वारंवार रुळ ओलांडू नका अशा सुचना दिल्या जातात. पण यातून कोण धडा घेताना दिसत नाही. माणसांना सांगून समजत नाही, पण प्राण्यांना सांगणार तरी कसं अशी परिस्थिती असते. अनेकदा असे घडते की, धावत्या ट्रेनसमोर अचानक रेल्वे ट्रॅकवर प्राणी येतात. अशावेळी काही प्राणी अपघाताचे बळी ठरतात. मात्र काहीवेळी लोको पायलट दूरचं प्राण्यांना पाहून ट्रेन थांबवतात आणि ते ट्रॅकवरुन दूर जाण्याची वाट पाहतात. सध्या अशाच एका घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यात भरधाव ट्रेनसमोर अचानक दोन गायी आल्या, यावेळी लोको पायलटने प्रसंगावधान राखत जी काही कृती केली ती पाहून अनेकजण भारावले आहेत. या व्हिडीओवर अनेकांनी लोको पायलटमधील मावनवतेला आणि संवेदनशीलतेला सलाम केला आहे. पण व्हिडीओमध्ये नेमकं काय घडलयं तुम्हीच पाहा…
रेल्वे ट्रॅकवर गायी पाहून लोको पायलटने दाखवली माणुसकी
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये पाहू शकता की, लोको पायलट ट्रेन वेगाने पुढे नेत असतो. तेव्हा अचानक एक गाय त्याला रेल्वे रुळ ओलांडताना दिसली. हे पाहून लोको पायलटने ताबडतोब ट्रेनचा वेग कमी केला आणि गायीने रेल्वे रुळ ओलांडेपर्यंत वाट पाहिली. जेव्हा गाय रुळ ओलांडत नाही तेव्हा तो ट्रेन हळू चालवत असतो. यानंतर पुढे त्याला आणखी एक गाय रेल्वे रुळावर जाताना दिसली. ही गाय पाहून तो ट्रेन पूर्णपणे थांबवतो. ही गाय देखील रुळ ओलांडून जात नाही तोपर्यंत लोको पायलट ट्रेन पुढे नेली नाही. अशाप्रकारे लोको पायलटने एकाचवेळी दोन गायींना जीवनदान दिले.
आत्तापर्यंत आपण पाहिले की, ट्रेन अपघातात अनेक प्राण्यांना आपला जीव गमवाला लागला. कारण ट्रेनचा वेगचं इतका जास्त असतो की समोर प्राणी दिसत असला तरी लोको पायलट पटकन ट्रेन थांबवू शकत नाही. पण ट्रेनचा वेग कमी असल्यास ट्रेन हळू करणे किंवा थांबवणे हे शक्य होते.
लोको पायलटमधील माणुसकीचे लोकांनी केले कौतुक
लोको पायलटने गायींप्रती दाखवलेली माणुसकी पाहून लोकांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. व्हिडीओखाली कमेंट्समध्येही त्याच्या कार्याला सलाम केले आहे. हा व्हिडीओ @NareshYadav100 नावाच्या युजरने हा एक्सवर शेअर केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, तुम्ही लोकांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि लोको पायलटसाठी दोन शब्द लिहावेत.
कमेंट करताना एका युजरने लिहिलेय की, “:खरोखर, लोको पायलटच्या मानवतेला आणि संवेदनशीलतेला सलाम”. दुसऱ्याने लिहिलेय की, “तो एक धार्मिक व्यक्ती आहे, भगवान नारायण त्याला आशीर्वाद देवो”. त्याचप्रमाणे आणखी एका युजरने “लोको पायलट खूप चांगला माणूस” असल्याचे संबोधले. अनेकांनी अशाप्रकारे, लोको पायलटच्या कार्याला सलाम करत त्याचे कौतुक केले आहे.