Railway Track Indian Or Malaysian Viral Fact: लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया वेबसाइटवर एक व्हिडिओ व्हायरल होत असल्याचे आढळले आहे. २ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये रेल्वे ट्रॅक टाकण्याची प्रक्रिया दाखवण्यात आली असून, हा व्हिडिओ भारतातील असल्याचा दावा केला जात आहे. हिंदू सेना या अधिकृत अकाउंटवर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की हे “भारतीय तंत्रज्ञान आहे. विरोधक ६० वर्षे सत्ता हातात असूनही असे तंत्रज्ञान अंमलात आणू शकले नाहीत कारण त्यांना भारतीय नागरिकांचे पैसे स्विस बँकेत जमा करायचे होते.” जय श्री राम म्हणत शेअर करण्यात आलेली ही पोस्ट तुफान व्हायरल होत आहे. अधिकृत अकाउंटवर शेअर करण्यात आलेली पोस्ट असली तरी काही सूचक घटकांमुळे याबाबत संशय निर्माण होतो. यानुसार आता या व्हिडिओमधील तथ्य आपण पडताळून पाहणार आहोत.

काय होत आहे व्हायरल?

X यूजर the Hindu Sena ने व्हायरल व्हिडिओ शेअर केला.

Nana Patole question regarding the action to be taken against Rashmi Shukla
रश्मी शुक्लांना हटवण्यास एवढा वेळ का लागला? नाना पटोले यांचा सवाल
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते…
Narayana Murthy Success Story
Success Story : एकेकाळी नोकरीसाठी मिळाला नकार; जिद्दीने उभी केली स्वतःची कंपनी अन् उभारला हजारो कोटींचा व्यवसाय
Bangladesh Power Supply Alert
Bangladesh Power Supply Alert : अदानी पॉवरचा बांगलादेशला वीज खंडित करण्याचा इशारा; मोहम्मद युनूस सरकार थकीत वीज बिल भरणार?
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
mumbai police (1)
पोलिसांच्या मेहनतीची सरकारलाच किंमत नाही; विशेष सुरक्षा तर पुरवली, पण त्याचे ७ कोटी मात्र थकित!
assembly elections 2024 Sc reservation Subclassification Grand Alliance Mahavikas Aghadi voting  print politics news
अनुसूचित जातीच्या मतांचे ध्रुवीकरण? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मुद्द्याचा फटका
Loksatta explained What is the secret behind canceling the acquisition of Metro 1
विश्लेषण: ‘मेट्रो १’चे अधिग्रहण रद्द करण्यामागचे नेमके रहस्य काय?

इतर वापरकर्ते देखील अशाच प्रकारच्या दाव्यांसह व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडिओ पाहिल्यानंतर मशीनवर ‘चायना कम्युनिकेशन्स कन्स्ट्रक्शन’ असे लिहिलेले आढळले. त्यानंतर रिव्हर्स इमेज सर्च चालवण्यासाठी आम्ही व्हिडिओमधून काही कीफ्रेम्स निवडल्या. रिव्हर्स इमेज सर्च चालवताना आम्हाला ‘चायना फोकस’चे एक ट्विट सापडले, ज्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणेच मशीनचे फोटो होते. ही पोस्ट १२ डिसेंबर २०२३ रोजी शेअर करण्यात आली होती.

आम्हाला ‘Sharing Travel’ या प्रोफाइलद्वारे पोस्ट केलेला व्हिडिओ सापडला. कॅप्शनमध्ये ‘मलेशियाच्या ईस्ट कोस्ट रेल्वेने ट्रॅक टाकण्यास सुरुवात केली’ असा उल्लेख केला आहे. ही पोस्ट ९ जानेवारी २०२४ रोजी शेअर केली होती.

आम्हाला रेल्वे ट्रॅक टाकण्याबद्दल काही बातम्या देखील सापडल्या.

https://english.news.cn/20231212/4d8233f458434f67a96c7eea36c380a7/c.html#:~:text=KUANTAN%2C%20Malaysia%2C%20Dec.,to%20witness%20the%20historic%20moment.
https://www.myanmaritv.com/news/first-track-has-been-laid-malaysia%E2%80%99s-mega-rail-project
https://www.ecns.cn/news/society/2023-12-12/detail-ihcvumcq4264871.shtml

आम्हाला यूट्यूबवर या कामाचा व्हिडिओ देखील सापडला.

बातम्यांमध्ये शेअर केलेले फोटो आणि व्हिडिओमधून मिळवलेल्या मुख्य फ्रेम्स सारख्याच होत्या.

हे ही वाचा << उपमुख्यमंत्र्यांनी तलवारबाजी केल्याचे सांगत Video व्हायरल; पण ‘ती’ महिला नक्की आहे कोण? पूर्ण सत्य समोर

निष्कर्ष: बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) च्या मेगा रेल्वे प्रकल्पाच्या अंतर्गत मलेशियाई ईस्ट कोस्ट रेल लिंक (ECRL) तर्फे ट्रॅक टाकण्याचा व्हिडिओ भारतातील असल्याचे सांगून व्हायरल होत आहे.