Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वेने दररोज लाखो प्रवासी प्रवास करतात. पण अनेकदा रेल्वेने प्रवास करताना प्रवाशांना वाईट अनुभवाचा सामना करावा लागतो. अशाच प्रकारे एक प्रवासी ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करीत होता. पण यावेळी प्रवाशांना ट्रेनच्या कॅंटीन कर्मचाऱ्यांना मनमानी सहन करावी लागली. एक प्रवासी रेल्वे कॅंटीन कर्मचाऱ्यांकडे पाणी मागत होता; यावेळी कॅंटीन कर्मचाऱ्याने प्रवाशांना दिलेली वागणूक पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यासंबंधीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक प्रवासी ट्रेनमधील कॅंटीनबाहेर उभा राहून कर्मचाऱ्याकडे पाणी मागत आहे. यावेळी कॅंटीन केबिनमध्ये उभा असलेला कॅंटीन कर्मचारी घड्याळाकडे बोट दाखवितो. त्यावर प्रवासी दुसऱ्या एका प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे त्याला पाणी पाहिजे. याचा वेळेशी काय संबंध, असा जाब विचारतो. पण, तरीही कॅंटीन कर्मचारी पाणी देण्यास नकार देतो. या संदर्भात प्रवाशाने एक व्हिडीओ आणि फोटो पोस्ट केला आहे. एका फोटोत दोन व्यक्ती पाण्याची बाटली घेऊन बसल्याचे दिसतेय. या व्हिडीओमध्ये कॅंटीन कर्मचारी प्रवाशाबरोबर मनमानी पद्धतीने वागताना दिसतोय.
मृतदेह दफनाच्या वेळची घटना पाहून अंगावर येईल काटा; स्मशानभूमीतील धडकी भरवणारा VIDEO
@Abhinav Singh नावाच्या युजरने एक्स युजरने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्याने सांगितले की, तो आणि सहप्रवासी ट्रेनमधील कॅंटीन कर्मचाऱ्याकडून पाणी मागत होता; परंतु त्या कर्मचाऱ्याने त्यांचे ऐकले नाही. यावेळी त्याने या घटनेचा व्हिडीओ बनवून समाजमाध्यमावर टाकला. त्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले की, भारतीय रेल्वेमधील पाण्यासाठीचा सुरू असलेला संघर्ष सत्य आहे. मी एकटा नव्हतो. तर, अजून पाच जणांना पाण्याची गरज होती. मी दरवाजा तोडणार होतो. तेवढ्यात कोणीतरी एक बाटली आणून मला दिली. पण त्यातील पाणी होते निकृष्ट!!
या व्हिडीओबाबत अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्यामध्ये अनेकांनी भारतीय रेल्वेतून प्रवास करतानाचे वाईट अनुभव शेअर केले आहेत.