Railway Station Viral Video: माणसाचे पूर्वज कोण या प्रश्नावर लहानपणापासून आपण शाळा- कॉलेजमध्ये अभ्यास केला आहे. उत्क्रांतीमधून धडे घेताना कशाप्रकारे मानवाची माकडांपासून निर्मिती झाली हे आपणही जाणून असाल. म्हणूनच कदाचित आपल्या शरीरातील एका महत्त्वाच्या अवयवाचे नाव सुद्धा माकडहाड असे आहे. जसे माणसांमध्ये काही प्रमाणात माकडांचे गुण दिसून येतात तसंच माकडांमध्ये पण काही प्रमाणात मानवी बुद्धीची झलक पाहायला मिळते. अगदी अन्न शोधण्यापासून ते एखाद्या गोष्टीला प्रतिक्रिया देण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये माणूस व माकड हे समसमान असल्याचे दिसते, आणि असं आम्ही नाही तर सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडिओच सांगत आहेत. असाच एक व्हिडीओ आपण आज पाहणार आहोत.

@The_Heavy_Locopilot या नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवर व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिल्याप्रमाणे भारतीय रेल्वेत आता नवी भरती झाली आहे. तुम्ही बघू शकता ही भरती कुणा माणसाची नसून चक्क एका माकडाची आहे. अगदी एखाद्या बड्या साहेबाला लाजवेल अशा रुबाबात हे माकड तिकीट खिडकीवर बसले आहे. तिकीट काढण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या संगणकाच्या समोर बसून हे माकड वेगाने कीबोर्डची बटणं सुद्धा दाबत आहे. बरं या सगळ्यात त्याचा अविर्भाव हुबेहूब माणसासारखा असल्याने अनेकांना याचं कुतुहूल वाटतंय. तुम्हाला खरं वाटत नसेल तर हा व्हिडीओ स्वतःच पाहा.

virat kohli anushka sharma gate way
VIDEO : विराट-अनुष्का मुंबईत परतले! गेटवे ऑफ इंडियाला दिसले एकत्र, विरुष्काच्या चाहतीची ‘ती’ रिअ‍ॅक्शन झाली व्हायरल
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
98th All India Marathi Literary Conference
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Dadar-Ratnagiri Railway , Konkan , train to UP,
दादर-रत्नागिरी सुरू करण्यासाठी प्रवासी एकवटले, कोकणात जाणारी गाडी बंद करून यूपीची गाडी
Marathi people from abroad , Marathi Sahitya Samelan,
साहित्य संमेलनातील सहभागासाठी परदेशातील मराठीजन उत्सुक
Tigress Zeenat Returns to Similipal Tiger Reserve in odisha
२१ दिवस, ३०० किलोमीटर आणि तीन राज्यातून वाघिणीचा प्रवास…आता तिला…..
cm devendra fadnavis on tour of naxal affected gadchiroli
नवीन वर्षाचा पहिलाच दिवस अन् मुख्यमंत्र्यांचा पहिला दौरा .. दुर्गम भागातील..

Video: बड्या साहेबाला लाजवेल हा माकडाचा SWAG

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये ‘एवढी’ जागा असते? बोरिवली ट्रेनमधील महिलांचा सुंदर Video पाहून म्हणाल, “बाईपण भारीच”

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून यावर हजारो कमेंट्स पाहायला मिळत आहेत. काहींनी तर यावरून रेल्वेलाच टोला लगावत बघा तुमच्यापेक्षा ते माकड वेगाने काम करतंय असं म्हटलं आहे. तर काहींनी माकडांच्या हुशारीला दाद देत असं लिहिलंय की, “माकडांना सगळं माणसासारखंच समजतं फक्त कर भरायला लागू नये आणि कामावर जावं लागू नये म्हणून ते हुशारीने माकड म्हणूनच जगतात” तुम्हाला ही हुशार माकडाची गोष्ट कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा.

Story img Loader