Indian Railway Viral Video : भारतीय रेल्वे जवानांच्या शौर्याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. हे जवान जेव्हा जेव्हा रेल्वे संकटात असते. तेव्हा मदतीसाठी धावून येतात. मग भीषण पूरस्थिती असो वा, भीषण रेल्वे अपघात भारतीय रेल्वे जवान नेहमी मदतीसाठी तत्पर असतात. यात आता हे जवान भारतीय रेल्वेच्या मदतीला पुन्हा धावून आले आहे. सध्या सोशल मीडियाववर भारतीय रेल्वेचे जवान रेल्वे प्रशासनाची मदत करत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत.
अनेकदा भारतीय रेल्वेचे विचित्र व्हिडीओ समोर येत असतात. कधी ट्रेनच्या आत प्रवाशांच्या गर्दीचे व्हिडीओ असो तर कधी ट्रेनच्या डब्ब्यातील प्रवाशांच्या भांडणाचा व्हिडीओ व्हायरल होतात. पण सध्या सोशल मीडियावर भारतीय जवान बंद ट्रेनला धक्का देत सुरु करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर युजर्स वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.
भारतीय जवान आणि रेल्वे कर्मचाऱ्यांना ट्रेनला ‘दे धक्का’
भारतात एकीकडे सुसाट धावणाऱ्या बुलेट ट्रेनची चर्चा आहे, तर दुसरीकडे भारतीय रेल्वेच्याच एका ट्रेनला ढकलतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशभर परसले आहे. जवळपास प्रत्येक लहान मोठ्या ठिकाणी भारतीय रेल्वे पोहचली आहे. पण एखादी ट्रेन बंद पडल्यानंतर ती ढकलून सुरु होत असल्याची घटना कधी तुम्ही पाहिली आहे का? सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक ट्रेन रुळावर उभी आहे आणि तिला काही लोक मिळून ढकलण्याचा प्रयत्न करत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये भारतीय रेल्वेचे जवान, काही रेल्वे कर्मचारी मिळून एका बंद पडलेल्या ट्रेनला धक्का देत आहेत. हे सर्वजण मिळून आधी ट्रेनला एका दिशेने ढकलत असल्याचे दिसत आहे, पण ट्रेन त्या दिशेला ट्रेन थोडीही सरकली नाही. यानंतर सर्वजण ट्रेनला दुसऱ्या दिशेने ढकलण्यास सुरुवात करतात आणि ट्रेन थोड्याच वेळात हळूहळू पुढे जाऊ लागते. ट्रेन पुढे सरकताच सर्व रेल्वे कर्मचारी आनंदी होतात. सर्वांचा हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता.
हा व्हिडिओ व्हायरल @syedrafi नावच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करण्यात आला आहे, ज्यावर आता राजकीय प्रतिक्रियांचा वर्षाव सुरू झाला. नुकताच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता ज्यात ट्रेनच्या इंजिनला धक्का दिला जात होता. एकीकडे भारतातील विविध ठिकाणांहून वंदे भारत ट्रेन सुसाट सुरू झाल्या आहेत, तर दुसरीकडे हे चित्र बरेच काही सांगून जात आहे. यात अनेकदा ट्रेनच्या बोगीतील अस्वच्छतेचे व्हिडिओही व्हायरल झाले आहेत. मात्र अनेकदा तक्रार करुनही जैसे थेच स्थिती अनेकदा पाहायला मिळते.