Rats enjoy open food at IRCTC stall Video Viral : रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी स्थानकावरील वडापाव, कटलेट, भेळसह इतर अनेक खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र, या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण- रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ ठेवले जात असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच काही फूड स्टॉल्सवर उंदीर, झुरळांचा वावरही अनेकदा दिसून आलाय. त्यातच पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शन रेल्वेस्थानकावरील एका स्टॉलवरच्या खाद्यपदार्थांवर उंदरांचा मु्क्त वावर असल्याचे दिसून आले आहे. स्टॉलवरील खाद्यपदार्थ, तसेच जमिनीवर ठेवलेल्या कंटेनरमधील प्लेट्सवर उंदीर फिरताना दिसत होते. या किसळवाण्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हीही रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉलवरील पदार्थ खाताना १०० वेळा विचार कराल.

रेल्वे प्रवाशांसाठी प्रत्येक रेल्वेस्थानकावर आयआरसीटीसी फूड स्टॉल चालवले जातात. मात्र, व्हिडीओतील या फूड स्टॉलवरील खाद्यपदार्थांवर उंदरांचा अक्षरश: सुळसुळाट पाहायला मिळतोय. या किळसवाण्या प्रकारानंतर अनेक युजर्स रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉलच्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत.

Viral Video Shows lion gripping a mans limbs
‘हे तुमच्या कर्माचे फळ…’ पिंजऱ्यातील पाळीव सिंहाने माणसावर केला हल्ला अन्… VIRAL VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Tiger enters toilet window viral video on social media
बापरे! शौचालयाच्या खिडकीत शिरला वाघ, मान बाहेर काढली अन्…, VIDEO मध्ये पाहा पुढे काय झालं…
leopard's mouth got stuck in the water pot
“लोक म्हणतात त्याला कर्माचे फळ मिळाले…”, कळशीत अडकलं बिबट्याचं तोंड अन् असं काही झालं; VIDEO पाहून नेटकरी करतायत कमेंट्स
amazing Ukhana for wife
“आला आला वाघ…?” कोल्हापुरच्या रांगड्या नवरदेवाचा बायकोसाठी जबरदस्त उखाणा, VIDEO एकदा पाहाच
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
three cheetahs attack the fox
‘तिघांच्या तावडीतून तो सटकला…’, तीन चित्त्यांचा कोल्ह्यावर हल्ला; थरारक VIDEO पाहून व्हाल शॉक
Bull attacked a person while he was dancing in front of him viral video on social media
बैलाशी मस्ती आली अंगाशी! माणसाच्या ‘या’ कृत्यामुळे बैल पिसाळला, शिंगाने उडवलं अन्…, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय झालं?

रेल्वेस्थानकावरील खाद्यपदार्थ खाणाऱ्यांनो हा व्हिडीओ पाहाच

दरम्यान, ‘ट्रेनवाले भैया’ या एक्स (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवरून रेल्वेस्थानकावरील किळसवाण्या प्रकाराचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. लोकांनी या व्हिडीओतील रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉल्सवरील खाद्यपदार्थांची गुणवत्ता आणि तेथील स्वच्छता पाहून तीव्र संताप व्यक्त केला आहे. तसेच या प्रकरणी कारवाईची मागणी केली आहे.

लहानपणी तुम्ही किती वेळा अशा प्रकारे घरी पोहोचलात? IPS अधिकाऱ्याने शेअर केला मजेशीर VIDEO

युजरने व्हिडीओ रेल्वे अधिकाऱ्यांना केला टॅग

दरम्यान, एक्स युजरने रेल्वे अधिकाऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यासाठी मिश्कील टिपण्णी करीत हा व्हिडीओ एक्सवर शेअर केला; ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “आयआरसीटीसी फूड इन्स्पेक्शन करण्यासाठी ड्युटीवर आहेत उंदीर.”

या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता, रेल्वे फूड स्टॉलवर किंवा आजूबाजूला कोणीही नसताना उंदीर कशा प्रकारे तिथले खाद्यपदार्थ आणि वस्तूंवर आरामात वावरत आहेत. जमिनीवर ठेवलेल्या प्लेट कंटेनरपासून ते स्टॉलवरील पदार्थांच्या प्लेटपर्यंत सर्वत्र उंदरांचा सुळसुळाट दिसत होता. धक्कादायक गोष्ट म्हणजे खाद्यपदार्थ असेच उघड्यावर ठेवून तेथील कर्मचारी कुठे गायब होते.

घटनेवर रेल्वे अधिकाऱ्याने दिले उत्तर

या किळसवाण्या प्रकारावर रेल्वे सेवा हॅण्डलवरून उत्तर देण्यात आले आहे. या घटनेची चौकशी केली जात आहे आणि पश्चिम-मध्य रेल्वेच्या भोपाळ विभागाकडून आवश्यक कारवाई केली जाईल. या नोटवर या विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक (DRM) यांनी नमूद केले की, त्वरित कारवाई करण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना दिले आहेत.

Story img Loader