Rats enjoy open food at IRCTC stall Video Viral : रेल्वेने प्रवास करताना अनेक प्रवासी स्थानकावरील वडापाव, कटलेट, भेळसह इतर अनेक खाद्यपदार्थ आवडीने खातात. मात्र, या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. कारण- रेल्वेस्थानकावरील फूड स्टॉलवर अतिशय घाणेरड्या पद्धतीने अन्नपदार्थ ठेवले जात असल्याचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. तसेच काही फूड स्टॉल्सवर उंदीर, झुरळांचा वावरही अनेकदा दिसून आलाय. त्यातच पुन्हा एकदा मध्य प्रदेशातील इटारसी जंक्शन रेल्वेस्थानकावरील एका स्टॉलवरच्या खाद्यपदार्थांवर उंदरांचा मु्क्त वावर असल्याचे दिसून आले आहे. स्टॉलवरील खाद्यपदार्थ, तसेच जमिनीवर ठेवलेल्या कंटेनरमधील प्लेट्सवर उंदीर फिरताना दिसत होते. या किसळवाण्या घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे; जो पाहिल्यानंतर तुम्हीही रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉलवरील पदार्थ खाताना १०० वेळा विचार कराल.
रेल्वेस्थानकावरील वडापावसह इतर खाद्यपदार्थ आवडीने खाताय? मग ‘हा’ किळसवाणा VIDEO पाहाच
Rat Recorded Roaming Around In IRCTC Food Stall : सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तुम्हीही रेल्वेस्थानकाच्या फूड स्टॉलवरील पदार्थ खाताना १०० वेळा विचार कराल.
Written by लोकसत्ता ऑनलाइन
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 08-01-2024 at 15:53 IST
TOPICSआयआरसीटीसीIRCTCट्रेंडिंगTrendingट्रेंडिंग न्यूजTrending Newsट्रेंडिंग व्हिडीओTrending Videoभारतीय रेल्वेIndian Railwayरेल्वेRailwayव्हायरल व्हिडीओViral Video
+ 3 More
मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Indian railway rats spotted enjoying open food at irctc stall in mps itarsi junction sjr