Indian Railway Shocking Video : देशात रेल्वे अपघातांतील मृत्यूच्या घटना वाढत आहेत. अनेक लोक निष्काळजीपणामुळे आपला जीव धोक्यात घालतात. प्रवासादरम्यान अगदी एका छोट्या चुकीमुळे प्रवाशांना काही वेळा आपल्या जीवाला मुकावे लागते. काही वेळा कायमचे अपंगत्व येते. सध्या रेल्वे रुळांवरील अशाच एका थरारक घटनेचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुमचाही थरकाप उडाल्याशिवाय राहणार नाही.
रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे रूळ ओलांडू नका, त्यावरून चालू नका, असे वारंवार सांगितले जाते. तरीही काही अतिउत्साही व निष्काळजी लोक तसे करताना दिसतात. या व्हिडीओतही तरुण तेच करताना दिसतोय. रेल्वे रुळांवरून चालताना तरुण एका पुलामधील गॅपमध्ये अडकून राहिला, हात-पाय गॅपमधून बाहेर आले; पण मान रेल्वे रुळांच्या अगदी जवळ अडकून राहिली. याच वेळी ट्रेनच्या हॉर्नचा आवाज आला. नंतर पुढे असं काही घडलं की, पाहून तुम्हालाही काही वेळा भीती वाटेल.
तरुण रुळांच्या बाजूच्या गॅपमध्ये अडकला अन्…
व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक तरुण अतिशय वाईटरीत्या एका पुलावरील रेल्वे रुळांमध्ये अडल्याचे दिसतेय. सुरुवातीला पाहताना खरंच वाटतं की, तो रुळांच्या बाजूच्या गॅपमध्ये अडकलाय; पण पुढच्याच क्षणी तो आपलं संपूर्ण शरीर त्या गॅपमधून बाहेर काढतो आणि रुळांवर लटकून राहतो. यावेळी मधेच ट्रेनच्या हॉर्नचाही आवाज येतो; पण ट्रेन काही तिथून जात नाही. अशा प्रकारे हा तरुण रुळांवर लटकलेल्या स्थितीत राहतो; पण अनेकांनी व्हिडीओतील ही दृश्यं खरी आहेत की खोटी, अशी शंका उपस्थित केली आहे. कारण- व्हिडीओच्या शेवटी स्पष्टपणे जाणवतेय की, त्या व्यक्तीने जाणूनबुजून स्वत:ला त्या परिस्थितीत टाकले आहे आणि लोकांना अडकल्यासारखे भासवतोय. तो रील्ससाठी हे सर्व करीत होता, असे दिसतेय.
रेल्वे पटरीवरील अपघाताटा शॉकिंग व्हिडीओ

हा व्हिडीओ @train_yatr144 नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये रेल्वे ट्रॅकवर अडकलेली व्यक्ती, असे लिहिले आहे. दरम्यान, हा व्हिडीओ आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिलाय आणि अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय की, ठीक आहे कट! खूप चांगला अभिनय केला आहे. चल, आता बाहेर ये. दुसऱ्याने लिहिलेय की, एक नंबरचा नाटकी, रील बनवतोय. अशा प्रकारे काही जण भन्नाट कमेंट्स करतायत; तर काहींनी तरुणावर कडक कारवाईची मागणी केली आहे.