Indian Railway TTE Beats Without Ticket Passenger Video: भारतीय रेल्वेच्या जनरल डब्यात अनेकदा प्रचंड गर्दी असते. यामध्ये अधिकृतरित्या प्रवास करणाऱ्यांसह ट्रेनचे तिकीट न काढता शिरणाऱ्यांचा सुद्धा समावेश असतो. गर्दीमुळे काहीवेळा तिकीट तपासले सुद्धा जात नाही आणि यामुळेच कित्येक जण रेल्वेच्या सुविधांचा गैरवापर करतात. विनातिकीट प्रवास हा निश्चितच एक गुन्हा आहे पण एखाद्याकडून गुन्हा झाला तर त्याला शिक्षा सुद्धा कायदेशीररीत्याच व्हायला हवी. हाच मुद्दा अचानक चर्चेत येण्याचे कारण म्हणजे सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असणारा एक व्हिडीओ. अनेकांनी शेअर केलेल्या एका व्हिडीओ तिकीट तपासण्यासाठी रेल्वेच्या डब्यात चढलेला एका टीटीई प्रवाशाला चक्क कानाखाली मारताना दिसत आहे. नेमकी या व्हिडिओची खरी कहाणी काय हे आपण सविस्तर पाहूया..

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओच्या कॅप्शनमधून समोर आलेल्या माहितीनुसार, बरौनी लखनऊ एक्सस्प्रेसमध्ये सदर घटना घडली होती. प्रवाशाकडे अधिकृत तिकीट नसल्याने एका टीटीईने चक्क सर्वांसमोर त्याला मारहाण केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. यावरून नेटकऱ्यांनी प्रश्न करत सरकारी कर्मचाऱ्याला अशाप्रकारचे हक्क दिलेले आहेत का? असे विचारले आहे. शिवाय टीटीईला जर तिकीट नाही हे लक्षात आले असेल तर त्याने प्रवाशाच्या तोंडावर कायद्याचे, नियमाचे पुस्तक फेकून मारायचे होते, मारहाण करण्याची काय गरज? अशाप्रकारे सामान्य माणसांना सरकारी कर्मचारी अपमानास्पद वागणूक देऊ शकतात का? अशा अनेक कमेंट्स या व्हिडीओखली पाहायला मिळत आहेत.

government contractor killed over two crores extortion money
दोन कोटींच्या खंडणीसाठी शासकीय ठेकेदाराचा खून; ग्रामीण पोलिसांकडून एकास अटक; मध्य प्रदेशातून दोघे ताब्यात
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Video Story Of Ravindra Dhangekar And Devendra Fadnavis.
Ravindra Dhangekar: “निवडणूक हरत असल्याचे लक्षात येताच…” फडणवीसांच्या ‘ॲक्सिडेंटल आमदार’ टीकेला धंगेकरांचे प्रत्युत्तर; पाहा व्हिडिओ
Worli hit and run case, High Court, Mihir Shah claim,
वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण : गुन्हा करताना सापडल्यानंतरही अटकेचे कारण सांगणे अपरिहार्य ? मिहिर शहाच्या दाव्यावर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
Municipal corporation Thane, illegal hoarding holders Thane, illegal hoarding Thane,
ठाण्यात ५२ बेकायदा होर्डिंगधारकांना पालिकेच्या नोटीसा, १० कोटी ९६ लाखांचा दंड पालिका करणार वसूल
mallikarjun kharge replied pm narendra
“पंतप्रधान मोदी म्हणजे ‘झुटों के सरदार’, त्यांनी हेच लाल संविधान…”; ‘त्या’ टीकेला मल्लिकार्जून खरगेंचं प्रत्युत्तर!
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…

Video: टीसीकडून प्रवाशाला मारहाण

दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर, भारतीय रेल्वेकडून याबाबत स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या टीसीला प्रवाशावर हात उचलल्याने निलंबित केले असून, संबंधितांची चौकशी सुरू करण्यात आली असल्याचे लखनऊच्या अधिकृत डीआरएम (डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर) कडून देण्यात आले आहे.

हे ही वाचा<< “BMC चे टॉयलेट्स..”, अमृता फडणवीसांना राम मंदिरात पायऱ्या पुसताना पाहून ट्रोलिंग सुरु! लोक म्हणतात, “चांगले कपडे..”

दुसरीकडे, काही दिवसांपूर्वी इंडिगोच्या पायलटला एका प्रवाशाने मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत आले होते. विमानांना झालेल्या दिरंगाईमुळे संतप्त प्रवाशाने घोषणा करत असतानाच पायलटवर हात उचलला होता. यावेळी अगदी काही सेलिब्रिटींनी सुद्धा या प्रवाशाचे संतापाला योग्य ठरवले होते. मात्र एअलाईन कडून या प्रवाशावरच कारवाई करण्यात आली होती. अशाप्रकारे जर प्रवाशाला नियम लागू केले जात असतील तर व्यवस्थापनेतील अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई व्हायलाच हवी अशी मागणी सुद्धा या रेल्वेच्या व्हायरल व्हिडीओवरून होत आहे.