Indian Railway Unhealthy Samosa Video : तुमच्यापैकी अनेक जण ट्रेनने प्रवास करीत असतील. त्यात लांब पल्ल्याच्या प्रवासासाठीही अनेक जण ट्रेनचा पर्याय निवडतात. या प्रवासादरम्यान भूक लागल्यास अनेक जण ट्रेनमधील फेरीवाल्यांकडून भेळ, समोसा, वडापाव, सँडविच, चहा विकत घेतात. पण, सोशल मीडियावर रेल्वेतील समोशाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही ट्रेनमध्ये समोसे खाणे कायमचे विसरून जाल. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

रेल्वेतील खाद्यविक्रेता अतिशय घाणेरड्या ठिकाणी समोसे ठेवून, नंतर ते एका पिशवीत भरून प्रवाशांना विकतोय. अशा प्रकारे तो प्रवाशांच्या आरोग्याशीच खेळत असल्याचे दिसत आहे, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये ट्रेनच्या टॉयलेटला लागून असलेल्या दरवाजाजवळ एका विक्रेत्याने सर्व समोसे ओतले आहेत आणि तेच एकेक करून पिशवीत भरत आहे. त्यानंतर हेच समोसे तो प्रवाशांना विकणार असल्याचा दावा व्हिडीओतून करण्यात आला आहे.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Aishwarya Narkar
Video: “शेवटचे एकदा…”, ऐश्वर्या नारकर यांनी कोणासाठी शेअर केली पोस्ट?
Morning Mantra
Morning Mantra: हिवाळ्यात सकाळी उठल्यानंतर तुमची ही सवय दिवसभर तुम्हाला ठेवेल आनंदी!
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Men walking with billboard of food delivery app in Bengaluru netizens not amused by marketing campaign
मार्केटिंगसाठी काहीही! फूड डिलिव्हरी ॲपचे बिलबोर्ड घेऊन रस्त्यावर फिरत आहे पुरुष, Viral Video पाहून चक्रावले नेटकरी
Indian Railways Shocking Video
ट्रेनमध्ये ‘ही’ सीट चुकूनही कोणालाही मिळू नये, तिकीट असूनही प्रवाशाला सहन करावा लागतोय त्रास; Video पाहून संतापले लोक

ट्रेनमधून प्रवास करताना अनेकदा समोसे विक्रेते समोसा, गरमागरम समोसा करून ओरडताना दिसतात. अशा वेळी प्रवासीदेखील समोसे विकत घेत, त्यावर ताव मारून खाताना दिसतात. पण, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ पाहून तुम्ही ट्रेनमधील समोसेच काय इतर कोणतेही पदार्थ खाताना १०० वेळा विचार कराल.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक समोसा विक्रेता ट्रेनमध्ये प्रवासी ज्या दरवाजाने आत चढतात अगदी तिथेच खाली पडलेले समोसे गोळा करून एका पिशवीत भरत आहे. धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी अगदी बाजूलाच टॉयलेट आहे आणि त्यामुळे अनेक प्रवासी सतत तिथून चप्पल घालून ये-जा करीत असतात. अगदी गलिच्छ आणि घाणेरड्या जागी पडलेले समोसे तो पुन्हा पिशवीत भरतो आणि नंतर तेच विकण्यासाठी ट्रेनभर फिरतो. तुम्ही विचार करा, हेच समोसे जर तुम्ही खाल्ले, तर तुमच्या आरोग्यावर काय विपरीत परिणाम होऊ शकतो. हा व्हिडीओ पाहून तुम्ही कदाचित आता रेल्वेतील समोसे खाणेच सोडून द्याल. अनेकांनी हा व्हिडीओ पाहताच संताप आणि घृणा व्यक्त केली आहे.

हेही वाचा – बाई sss हा काय प्रकार! बसमध्ये मोठ्याने गाणी ऐकणाऱ्या तरुणावर भुंकू लागली तरुणी; video पाहून युजर्स म्हणाले…

पण, केवळ समोसेच नाही, तर ट्रेनमध्ये विकले जाणारे अनेक खाद्यपदार्थ अस्वच्छ ठिकाणी बनवले जातात किंवा ठेवले जातात याचे अनेक व्हिडीओ तुम्ही यापूर्वीदेखील पाहिले असतील. हे पदार्थ खाल्ल्याने प्रवाशांना फूड पॉयजनिंग आणि पोटाशी संबंधित अनेक समस्या होऊ शकतात.

ट्रेनमधील अत्यंत किळसवाणा प्रकार

पण, तरीही अनेक प्रवासी कसलाही विचार न करता, भूक भागविण्यासाठी म्हणून ट्रेनमध्ये हे पदार्थ विकत घेऊन खातात. पण, हा व्हिडीओ पाहिल्यानंतर तरी ट्रेनने प्रवास करताना सर्व काही घरून घेऊन जाण्याचा प्रयत्न करा. दरम्यान, अनेक जण हा व्हिडीओ पाहून आता संबंधित समोसा विक्रेत्यावर कडक कारवाई करा, अशी मागणी करीत आहेत.

Story img Loader