Indian Railway Video: देशातील जवळपास निम्मी लोकसंख्या कुठेही जाण्यासाठी रेल्वेने प्रवास करते. आपल्याला जेव्हा लांबचा प्रवास करायचा असतो, तेव्हा आपण रेल्वेचा मार्ग अवलंबतो. कारण- ट्रेनचा प्रवास हा सर्वांत सोईचा असतो. त्यासाठी लागणारं तिकीटदेखील बऱ्यापैकी स्वस्त आणि सर्वसामान्यांना परवडणारं असतं. जनरल आणि स्लीपर कोच यापैकी एकाचं तिकीट काढून किंवा ते आरक्षित करून प्रवाशांना सोईस्कर प्रवास करता येतो. पण, बऱ्याचदा ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक प्रवाशांमध्ये जोरदार भांडण होतं. या संदर्भातील व्हिडीओही व्हायरल होत असतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भारतीय रेल्वेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या क्लिपमध्ये महिला प्रवासी सीटवरून एका पुरुषाशी वाद घालताना दिसत आहे. मात्र, ती व्यक्ती ज्या सीटवर बसली होती, ती त्याची राखीव जागा होती. पण, असं असतानाही ती त्या पुरुषाला त्या जागेवर सामावून घेण्याचा आणि वृद्ध महिलेला बसू देण्याचा आग्रह धरत होती.

जेव्हा महिलेनं म्हटलं की, माणुसकी नाही… तेव्हा त्या पुरुषानं असं उत्तर दिलं की, इंटरनेटचे लोकही त्याच्यावर मत मांडत आहेत. हा व्हिडीओ केव्हा आणि कोणत्या ट्रेनमध्ये चित्रित करण्यात आला आहे, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. पण, ट्रेनमध्ये आरक्षण केल्यानंतरही प्रवाशांना ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यांच्या व्यथांना वाचा फोडणारा हा व्हिडीओ नक्कीच लोकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ही क्लिप २.२० सेकंदांची आहे आणि त्यामध्ये ट्रेनचा डबा माणसांनी खचाखच भरलेला दिसतो. लोक वर चढत आहेत आणि जागांसाठी लढत आहेत. दरम्यान, एक महिला आली आणि आरक्षित जागेवर बसलेल्या व्यक्तीला आम्हाला बसू दे म्हणते. परंतु, जेव्हा त्या व्यक्तीने त्यांना सीटवर बसू देण्यास नकार दिला तेव्हा ती व्यक्ती वाद घालू लागते.

(हे ही वाचा: दैव बलवत्तर म्हणून ‘तो’ वाचला, मृत्यू जवळ आला अन् ‘असा’ चमत्कार झाला; नेमकं घडलं काय? पाहा थरारक Video)

ती महिला मोठ्या आवाजात म्हणताना ऐकू येते की, “वृद्ध महिला उभी आहे आणि तिला सीटवर बसू देत नाहीये… माणुसकी नाही का?” त्यावर ती व्यक्ती म्हणाली, “मी माझ्या मुलांना बसण्यासाठी आरक्षण केले आहे…. मी जागा का देऊ… माझ्यात माणुसकी नाही…”

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @gharkekalesh नावाच्या X हॅण्डलने पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले, “भारतीय रेल्वेमध्ये एक महिला आणि आरक्षित सीट असलेल्या प्रवाशामध्ये सीटच्या मुद्द्यावरून वाद झाला.” वृत्त लिहिपर्यंत या व्हिडीओला एक लाखाहून अधिक व्ह्युज आणि शेकडो लाइक्स आणि प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. @47Sha_ नावाच्या युजरने लिहिले, “म्हणूनच आम्हाला लोकसंख्या नियंत्रण विधेयक हवे आहे.” @imansiofficial ने टिप्पणी केली, “गरीब लोक राखीव सीटवरील व्यक्तीला दोषी मानतात. रेल्वेने हा प्रश्न सोडवावा.” काही वापरकर्त्यांनीही तसे सांगितले.