Indian Railway Viral Video : सोशल मीडियावर ट्रेनमधील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. कधी कोणी ट्रेनमध्ये गाणी गाताना दिसतात, तर कधी कोणी अश्लील डान्स करताना दिसतात. कधी कधी सीटवरून दोन प्रवाशांमध्ये तुफान वाद होतो, तर कधी विनातिकीट प्रवाशांची दादागिरी पाहायला मिळते. सध्या ट्रेनमधील असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी आरक्षित तिकाटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशाला सीटसाठी दादागिरी करताना दिसत आहे. यावेळी दोघांमध्ये शाब्दिक चकमक होते. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हा व्हायरल व्हिडीओ एका लांबपल्ल्याच्या एक्स्प्रेस ट्रेनमधील आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, स्लीपर कोचमध्ये एक प्रवासी आरामात झोपलेला आहे. यावेळी एक विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी त्याच्या सीटजवळ येतो आणि आता उठ, मला इथे बसू दे असे म्हणत दादागिरी करतो. यावर सीटवर झोपलेला प्रवासी चिडतो आणि म्हणतो की, आम्ही आमच्या घरी आरामात जाण्यासाठी सीट आरक्षित केली आहे. त्याच्या बोलण्यावर तो विनातिकीट प्रवास करणारा प्रवासी चिडतो आणि भांडायला लागतो. तू सीट बुक केलीस तर काय घरी घेऊन जाणार आहेस का? असा उलट प्रश्न करतो, ज्यावर झोपलेला प्रवासी त्याला सीट आरक्षित का केली जाते; सुविधेसाठी म्हणत, सीट पाहिजे तर जनरल कोचमध्ये जा असे म्हणतो.

Chinese tourist fell down from train
‘सेल्फी’साठी तरुणी ट्रेन बाहेर डोकावताच झाडाला आदळली अन्…; पुढे जे झालं ते चमत्कारापेक्षा कमी नाही, पाहा अपघाताचा थरारक VIDEO
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Female Chinese Tourist Miraculously Survives After Falling From Running Train In Colombo Chilling Videos
धावत्या रेल्वेच्या दरवाज्यात उभी होती तरुणी, अचानक पाय सटकला अन्…. थरारक घटनेचा Video Viral
Gujarat suv car accidnet video viral
VIDEO : ढाब्यावर लोक जेवत असतानाच पाठीमागून भरधाव आली कार अन्…; थरारक लाइव्ह अपघात, सांगा चूक नक्की कुणाची?
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Vasota Jungle Trek
मरणाची गर्दी! वासोटा ट्रेकला जाण्यापूर्वी हा VIDEO एकदा पाहाच
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

एवढं बोलूनही तो विनातिकीट प्रवासी तिथून हलत नाही आणि वर त्यालाच म्हणतो की, दिवसापण सीटवर बसायला देणार नाही का? अशाप्रकारे दोघांमध्ये शाब्दिक भांडण सुरू असते. पण, ट्रेनमध्ये आरक्षित तिकीट असूनही अनेकदा प्रवाशांना अशा विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दादागिरी सहन करावी लागते. काहीवेळा असे प्रवासी जागेसाठी मारामारी करायलादेखील मागे पुढे पाहत नाहीत, त्यामुळे या समस्येवर तात्काळ रेल्वे प्रशासनाने काहीतरी उपाय करावे, अशी विनंती अनेकदा प्रवाशांकडून केली जाते.

विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाची दादागिरी

हा व्हिडीओ एक्सवर @gharkekalesh नावाच्या अकाउंटवरून शेअर केला आहे, जो आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि त्यावर कमेंट्ससुद्धा केल्या आहेत. एका युजरने लिहिले की, ‘अशाप्रकारे कोण भांडतं भावा?’, तर दुसऱ्याने लिहिले की, ही तर जबरदस्ती चालू आहे.’ याशिवाय इतरही अनेकांनी यावर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Story img Loader